वृत्तसंस्था, लंडन
चेक प्रजासत्ताकच्या टेनिसपटूंमध्ये झालेल्या विम्बल्डन महिला एकेरीच्या अंतिम लढतीत लिंडा नोस्कोव्हाने आपल्या ताकदवान स्व्हिहसच्या जोरावर विजेतेपद पटकावले. नोस्कोव्हाने आपलीच देशवासीय कॅरोलिना मुचोव्हा हिचा तीन सेटच्या लढतीत ६-३, ५-७, ६-३ असा पराभव करत कारकीर्दीतील पहिले ग्रॅँडस्लॅम विजेतेपद मिळवले.
पहिला सेट सहज जिंकल्यानंतर नोस्कोव्हाला दुसर्या सेटमध्ये पाच ‘मॅच पॉइंट’सह सेट गमवावा लागला होता. मात्र, निर्णायक तिसर्या सेटमध्ये आपल्या वेगवान स्व्हिहसचा सुरेख उपयोग करून तिने विम्बल्डन विजेतेपदाचे स्वप्न साकार केले. ही लढत २ तास ३५ मिनिटे चालली. यातील दुसरा सेट सर्वाधिक १ तास १५ मिनिटे चालला.
निर्णायक सेटमध्ये नोस्कोव्हाला पहिल्याच गेममध्ये स्व्हिहस राखण्यासाठी संघर्ष करावा लागला. मात्र, दोन गेम पॉइंट वाचवून तिने आपली स्व्हिहस राखण्यात यश मिळवले. नंतर तिने मुचोव्हाची स्व्हिहस सहज भेदली. पुढे ही आघाडी नोस्कोव्हाने कायम राखली. आपल्या वेगवान स्व्हिहसच्या मुख्य अस्त्राचा तिने निर्णायक सेटमध्ये अचूक उपयोग केला. नोस्कोव्हाने संपूर्ण सामन्यात १० बिनतोड स्व्हिहस केल्या.
युवा विजेती विम्बल्डन स्पर्धेत महिला
एकेरीचे विजेतेपद मिळवणारी २१ वर्षीय नोस्कोवा २०११ नंतरची सर्वांत युवा टेनिसपटू ठरली. त्यावेळची विजेती पेट्रा क्विटोवाही २१ वर्षांची होती. विम्बल्डनच्या महिला एकेरीत नोस्कोव्हा गेल्या चार वर्षांतील तिसरी नवविजेती ठरली.
