साराजेव्हो : भारताच्या १६ वर्षीय ज्युडोपटू लिंथोई चनाम्बामने साराजेव्हो येथे झालेल्या जागतिक कॅडेट ज्युडो अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. कोणत्याही वयोगटात हे यश मिळवणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.

महिलांच्या ५७ किलो वजनी गटात मणिपूरच्या लिंथोईने ब्राझीलच्या बियान्का रेइसचा पराभव करून ऐतिहासिक कामगिरी केली. ‘‘ही माझ्यासाठी अविश्वसनीय कामगिरी आहे. मी मनापासून केलेल्या कामगिरीचा हा परिणाम आहे,’’ असे लिंथोई म्हणाली.

gukesh d creates history becomes youngest Player to win fide candidates title zws
गुकेशला ऐतिहासिक जेतेपद; नामांकितांना मागे सोडत ‘कँडिडेट्स’मध्ये अजिंक्य; जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी पात्र
Mr. Gay Nepal 2024
‘मिस्टर गे नेपाळ २०२४’ चा किताब लक्ष्मण मगर यांनी जिंकला; आता लंडनमध्ये करणार प्रतिनिधित्व
candidates chess 2024 vidit gujrathi beats nakamura
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : विदितचा नाकामुरावर पुन्हा विजय, गुकेशची प्रज्ञानंदशी बरोबरी; नेपोम्नियाशीसह संयुक्त आघाडीवर
d Gukesh defeated Nijat Abasov in the Candidates chess tournament sport news
गुकेश संयुक्त आघाडीवर! पाचव्या फेरीत अबासोववर मात; अन्य भारतीयांच्या लढती बरोबरीत

‘‘मी २०१४ पासून ज्युडो खेळण्यास सुरुवात केली आणि ऑक्टोबर २०१७ मध्ये मी बेल्लारी येथील इन्स्पायर्ड इन्स्टिटय़ूट ऑफ स्पोर्ट्स (आयआयएस) मध्ये गेले. गेल्या पाच वर्षांमध्ये सर्वाच्या पाठिंब्यामुळे माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली आहे,’’ असे लिंथोईने सांगितले.

जागतिक कॅडेट अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करण्यापूर्वी लिंथोईने २०१८ मध्ये उपकनिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सुवर्ण जिंकले होते. २०२१ मध्ये तिने चंडीगड येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर या वर्षी जुलैमध्ये आशियाई कॅडेट आणि कनिष्ठ ज्युडो अजिंक्यपद स्पर्धेतही सुवर्णपदक मिळवत आपली छाप पाडली.

२०२४ मध्ये होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसह इतर मोठय़ा स्पर्धामध्ये चमकदार कामगिरीचा निर्धार लिंथोईने केला आहे. ‘‘मी पॅरिसमध्ये पदक जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन; पण तेथे शक्य न झाल्यास २०२८ मध्ये होणाऱ्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्यासाठी मी प्रयत्नशील असेन,’’ असे लिंथोईने नमूद केले.