एपी, पॅरिस : सात वेळचा बॅलन डी’ओर पुरस्कार विजेता लिओनेल मेसीसह पॅरिस सेंट-जर्मेन फुटबॉल संघातील चार खेळाडूंना करोनाची लागण झाली आहे. युरोपातील विविध फुटबॉल स्पर्धावरील करोनाचे सावट दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आघाडीपटू मेसी, बचावपटू जुआन बेर्नात, राखीव गोलरक्षक सर्जिओ रिको आणि १९ वर्षीय मध्यरक्षक नेथन बिटूमाझाला यांचा करोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आल्याचे सेंट-जर्मेन संघाने आपल्या निवेदनात म्हटले. साहाय्यकांमधील एका सदस्यालाही या विषाणूची बाधा झाली आहे. त्यामुळे त्यांची चिंता वाढली आहे. सेंट-जर्मेनचा सोमवारी फ्रेंच चषक स्पर्धेत व्हॅना संघाशी सामना होणार आहे. तसेच जर्मनीतील फुटबॉल संघ बायर्न म्युनिकमधील चार खेळाडूंनाही करोनाची बाधा झाली आहे. यात कर्णधार मॅन्युएल नॉयर, किंगस्ले कोमान, कॉरेन्टिन टोलिसो आणि ओमर रिचर्डस यांचा समावेश असल्याचे बार्यनकडून सांगण्यात आले. साहाय्यक प्रशिक्षक डिनो टॉपमोलेर हेसुद्धा करोनाबाधित आहेत.

Bernd Holzenbein dead at 78
माजी फुटबॉलपटू होल्झेनबाइन यांचे निधन
Champions League Football Barcelona beat Paris Saint Germain sport news
चॅम्पियन्स लीग फुटबॉल: बार्सिलोनाची पॅरिस सेंट-जर्मेनवर मात
Big blow to England team before World Cup 2024
T20 World Cup 2024 : विश्वचषकापूर्वी इंग्लंड संघाला मोठा धक्का! स्टार अष्टपैलू खेळाडूने आगामी स्पर्धेतून घेतली माघार
rohan bopanna and matthew ebden win miami open men s doubles title
मियामी खुली टेनिस स्पर्धा : बोपण्णा-एब्डेन जोडीला विजेतेपद