Net Worth Of Lionel Messi: फुटबॉल चाहत्यांना मोठा धक्काच बसला आहे. कारण सर्वांचा आवडता आणि लोकप्रिय असा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. मेस्सीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करुन निवृत्तीची घोषणा केली. या पोस्टमध्ये ३ चिठ्ठ्या होत्या आणि कॅप्शनमध्ये त्याने निवृत्तीबाबत आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या होत्या. दरम्यान फुटबॉलचं मैदान गाजवणारा मेस्सी आपल्या लाईफस्टाईलमुळेही चर्चेत राहिला आहे. दरम्यान मेस्सीची एकूण संपत्ती किती? जाणून घ्या.
फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. त्यामुळे फुटबॉल खेळणारे खेळाडूही बक्कळ पैसा कमावतात. क्रिकेटपटू आणि फुटबॉलपटूंच्या कमाईची तुलना केली, तर फुटबॉलपटू खूप कमी आहे. त्यात मेस्सी हा लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. त्यामुळे फुटबॉलसह जाहीराती आणि प्रमोशनमधूनही तो भरपूर कमाई करतो.
लिओनेल मेस्सीची एकूण संपत्ती किती?
माध्यमातील वृत्तानुसार, लिओनेल मेस्सीची एकूण संपत्ती १.१ बिलियन डॉलरच्या घरात आहे. भारतीय चलनानुसार मेस्सीची एकूण संपत्ती ही १०,४५० कोटी रुपये इतकी आहे. मेस्सी हा फोर्ब्सच्या यादीत सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या स्थानी होता. त्याची वर्षाची कमाई १४० मिलियन डॉलर इतकी होती. जी भारतीय चलनानुसार १३०० कोटी रुपये इतकी आहे. तर विराट कोहली आणि मेस्सीच्या कमाईची तुलना केली, तर विराटची एकूण संपत्ती ही १०५० कोटी रूपये इतकी आहे. तर रोहित शर्माची एकूण सपंत्ती ही २३० कोटींच्या घरात आहे. जर मेस्सी, विराट आणि रोहितच्या कमाईची तुलना केली, तर विराट कोहली आणि रोहित शर्माची एकूण संपत्ती ही मेस्सीच्या एका वर्षाच्या कमाईपेक्षाही कमी आहे.
मुख्य बाब म्हणजे मेस्सी वर्षाला जितकी कमाई करतो त्यापैकी ५० टक्के रक्कम ही फुटबॉलमधून कमावतो. तर उर्वरीत ५० टक्के रक्कम ही जाहीराती आणि ब्रँड एंडॉर्समेंटमधून कमावतो. पण मेस्सी नेमकी किती कमाई करतो, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
