FIFA World Cup 2026 Argentina vs Spain: विश्वविजेता अर्जेंटिना संघाने आपला क्लास पुन्हा एकदा दाखवून दिला. सामना संपण्यासाठी ११ मिनिटं शिल्लक असताना अर्जेंटिनाने सामन्यात पुनरागमन केलं. दोन गोलांनी पिछाडीवर असतानाही अर्जेंटिनाने अविश्वसनीय पुनरागमन करत फिफा विश्वचषकातील सर्वात संस्मरणीय विजय साकारला. ०-२ अशा पिछाडीवरून सामना संपायला ११ मिनिटं शिल्लक असताना अर्जेंटिनाने पुनरागमन केलं आणि ३-२ अशी आघाडी घेत इजिप्तला मोठा धक्का दिला.

या निर्णायक क्षणी ७९व्या मिनिटाला ज्युलियन अल्वारेझने उजव्या बाजूला लाऊटारो मार्टिनेझकडे चेंडू पास दिला. मार्टिनेझने योग्य क्षणाची वाट पाहत पेनल्टी क्षेत्रात अचूक क्रॉस टाकला आणि एन्झो फर्नांडेझने अप्रतिम हेडर मारत चेंडू थेट जाळ्यात धाडला. या गोलानंतर अर्जेंटिनाच्या राखीव खेळाडूंनी मैदानात धावत येत जल्लोष केला. लिओनेल मेस्सीने संघाच्या पुनरागमनाची ठिणगी पेटवली, तर एन्झो फर्नांडेझने विजयी गोल करत अर्जेंटिनाला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवलं. दुसरीकडे, इजिप्तचा संघ या अनपेक्षित कमबॅकमुळे पूर्णपणे हादरून गेला.

सामना संपायला ११ मिनिटं शिल्लक असताना अर्जेंटिनाने कसं केलं कमबॅक?

फिफा विश्वचषकाच्या इतिहासात दोन गोलांनी पिछाडीवर पडल्यानंतर अर्जेंटिनाने विजय मिळवत ऐतिहासिक पुनरागमनाची नोंद केली. विशेष म्हणजे, हा थरार लिओनेल मेस्सीच्या जादुई खेळामुळेच शक्य झाला. अटलांटा स्टेडियमवर इजिप्तविरुद्धच्या राऊंड ऑफ-१६ सामन्यात ७८व्या मिनिटापर्यंत अर्जेंटिना ०-२ ने पिछाडीवर होता. त्यात मेस्सीने पेनल्टीही दवडली होती आणि त्यामुळे हा दिवस त्यांच्यासाठी निराशाजनक ठरणार, असं वाटत होतं.

मात्र, त्यानंतर अवघ्या चार मिनिटांत संपूर्ण सामन्याचं चित्र पालटलं. अर्जेंटिनाने ०-२ वरून २-२ अशी बरोबरी साधली आणि अखेर अतिरिक्त वेळेत एन्झो फर्नांडेझच्या विजयी हेडरच्या जोरावर ३-२ असा थरारक विजय मिळवला. अर्जेंटिनाच्या पहिल्या गोलसाठी मेस्सीने अप्रतिम क्रॉस देत क्रिस्टियन रोमेरोला हेडरची संधी निर्माण करून दिली, तर काही मिनिटांनंतर त्याने स्वतःही गोल करत संघाला बरोबरी मिळवून दिली.

या गोलसह मेस्सीने सुरू असलेल्या विश्वचषकात आपला आठवा गोल नोंदवत गोल्डन बूट शर्यतीत पुन्हा आघाडी घेतली. इतकंच नव्हे, तर विश्वचषकातील सलग नऊ सामन्यांत गोल करण्याचा मानही त्याने आपल्या नावावर केला.

अर्जेंटिना-इजिप्त सामना प्रचंड नाट्यमय ठरला. सामन्याच्या १५व्या मिनिटालाच यासेर इब्राहिमने हेडरद्वारे गोल करत इजिप्तला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर अर्जेंटिनाला बरोबरीची सुवर्णसंधी मिळाली, मात्र पेनल्टीसाठी पुढे आलेल्या लिओनेल मेस्सीचा फटका गोलरक्षक मोस्तफा शोबेरने शानदार बचाव करत रोखला.

दुसऱ्या हाफमध्ये मोस्तफा झिकोने चेंडू जाळ्यात धाडला होता, पण VAR तपासणीनंतर तो गोल ऑफसाइडमुळे रद्द करण्यात आला. मात्र, अवघ्या दहा मिनिटांनंतर झिकोने पुन्हा गोल करत इजिप्तची आघाडी २-० अशी भक्कम केली. यावेळी VARनेही गोल वैध ठरवला. त्या क्षणी इजिप्त पहिल्यांदाच फिफा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणार, हे जवळपास निश्चित झाल्याचं चित्र दिसत होतं. मात्र, त्यानंतर अर्जेंटिनाने अविश्वसनीय पुनरागमन करत सामना ३-२ असा सामना जिंकला.