FIFA World Cup 2026 Argentina vs England: गतविजेता अर्जेंटिनाचा संघ फिफा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. अर्जेंटिनाचा उपांत्य फेरीतील सामना इंग्लंडविरूद्ध होणार आहे. दोन्ही संघ या मोठ्या लढतीसाठी सज्ज झाले आहेत. संघाचा स्टार कर्णधार लिओनेल मेस्सी संघाचा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे. अखेरचा फिफा विश्वचषक खेळत असलेल्या मेस्सीसाठी हा सामना महत्त्वाचा असणार आहे. पण मेस्सीसुद्धा इतर खेळांमधील खेळाडूंप्रमाणे सामन्यापूर्वी काही अंधश्रद्धा किंवा ठरलेली एखादी पद्धत करतो का, जाणून घेऊया.
अर्जेंटिनाचा ३९ वर्षीय कर्णधार मेस्सी हा निःसंशयपणे ईश्वरावर श्रद्धा ठेवणारा माणूस आहे. २०२२ च्या विश्वचषकातील विजयानंतर मेस्सी म्हणाला होता, “मी काहीच केलं नाही; देवानेच मला अशा प्रकारे खेळायला लावलं.” मेस्सी म्हणतो की, सामन्यापूर्वी जे काही कपडे सहजपणे हाताशी असतील, तेच तो परिधान करतो. तीन दशकांहून अधिक काळ केलेल्या कठोर परिश्रमांमुळेच आपण या स्थानापर्यंत पोहोचलो आहोत, अशी त्याची धारणा आहे. पण मेस्सी त्यांचा खास सवंगडी रॉड्रीगो दी पॉल व अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष क्लॉडियो ‘चिकी’ तापिया एक परंपरा कायम ठेवतात.
अर्जेंटिनासाठी शुभसंकेत मानली जाणारी काय आहे ती परंपरा?
अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष ‘चिकी’ आणि मेस्सी यांच्यात हर्बल टी शेअर करण्याची प्रथा कोपा अमेरिका, २०२२ चा विश्वचषक आणि २०२४ च्या कोपा अमेरिका स्पर्धेदरम्यानही दिसून आली. मेस्सी आपल्या कठोर परिश्रमांवर विसंबून असतो. आजच्या या महत्त्वाच्या सेमीफायनल सामन्यापूर्वीही बोर्डाचे अध्यक्ष चिकी तापिया यांनी हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो पोस्ट करत ते संघाला शुभेच्छा देतात आणि चाहत्यांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करतात. हा फोटो आता अर्जेंटिना चाहत्यांसाठी एक प्रकारचा “शुभसंकेत” किंवा “ठरलेली परंपरा” बनला आहे.
अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष ‘चिकी’ आणि मेस्सी यांच्यात हर्बल टी शेअर करण्याची प्रथा कोपा अमेरिका, २०२२ चा विश्वचषक आणि २०२४ च्या कोपा अमेरिका स्पर्धेदरम्यानही दिसून आली. मेस्सी आपल्या कठोर परिश्रमांवर विसंबून असतो. आजच्या या महत्त्वाच्या सेमीफायनल सामन्यापूर्वीही बोर्डाचे अध्यक्ष चिकी तापिया यांनी हा फोटो शेअर केला आहे.
काय आहे येरबा माटे ड्रिंक?
लिओनेल मेस्सी व अर्जेंटिना संघातील सर्व सहकारी अनेकदा एक विशिष्ट भांड व स्ट्रॉ घेऊन हा हर्बल टी पिताना दिसतात. या खास ड्रिंकचं नाव येरबा माटे (Yerba Mate) असं आहे. हे पारंपारिक साऊथ अमेरिकन ड्रिंक असून ते अर्जेंटिनाचं राष्ट्रीय पेय आहे. हे पेय येरबा माटे वनस्पतीपासून तयार केलं जातं. येरबा माटे या वनस्पतीचा चुरा करून तो लौकी नावाच्या पारंपारिक भांड्यामध्ये टाकून हे ड्रिंक पिण्याची पद्धत आहे. यामध्ये एक विशिष्ट जाळीदार स्ट्रॉ असतो, जेणेकरून पानं गाळून हे ड्रिंक पिता येईल.
