फिफा विश्वचषक २०२२ जिंकल्यानंतर अर्जेंटिनाचा संघ आपल्या देशात परतला आहे. येथे टीमचे खेळाडू ३६ वर्षांनंतर सर्व देशवासीय आणि फुटबॉल चाहत्यांसोबत विजयाचा आनंद साजरा करत आहेत. यादरम्यान अर्जेंटिनाचा संघ बसमध्ये ट्रॉफी घेऊन चाहत्यांसोबत रॅलीत सामील झाला. या रॅलीदरम्यान मोठी दुर्घटना टळली आणि मेस्सीसह पाच खेळाडू बचावले.

अपघात कसा टळला?

अर्जेंटिनाचे सर्व खेळाडू ट्रॉफीसह बसमध्ये चढून रॅलीमध्ये सामील झाले. अर्जेंटिना संघ चाहत्यांसह शहरात फिरत होता. ट्रॉफी घेऊन जाणाऱ्या बसच्या छतावर मेस्सीसह पाच खेळाडू बसले होते. त्यानंतर या खेळाडूंसमोर विजेची तार आली. सुरुवातीला कोणाच्याच लक्षात आले नाही, पण योग्य वेळी एका खेळाडूने ते पाहिले आणि सर्वांना सावध केले.

IPL 2024 CSK Themed Wedding Invitation Card Went Viral
IPL 2024: चेन्नईच्या चाहत्यांचा नाद खुळा! CSK ची थीम अन् आयपीएलच्या तिकीटासारखी लग्नपत्रिका होतेय व्हायरल
Devon Conway Out Of IPL 2024
IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का! ‘हा’ स्टार खेळाडू दुखापतीमुळे IPL मधून बाहेर
Shocking video 9 year old girl going to school was attacked by a pitbull dog
VIDEO: भयंकर! चिमुकला अंगणात खेळत होता; इतक्यात पिटबुल कुत्रा आला अन्..आधी हल्ला, मग ओढून नेलं
Taiwan Earthquake
Taiwan Earthquake : भूकंपाची चाहूल लागताच कुत्र्याने घरातल्या लोकांना केले सावध, तैवान येथील भूकंपाचा व्हिडीओ व्हायरल

अखेरच्या क्षणी सर्व खेळाडू नतमस्तक झाले आणि बस विजेच्या तारेखाली गेली. या तारेमुळे खेळाडूंना विजेचा धक्का बसण्याचा धोका नव्हता, मात्र तारेवर आदळल्याने हे खेळाडू बसमधून खाली पडून मोठी दुर्घटना घडू शकली असती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अर्जेंटिनाच्या खेळाडूंचे ब्युनोस आयर्समध्ये भव्य स्वागत करण्यात आले. विमानतळावर चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बस विजयी मिरवणुकीचा भाग म्हणून सर्व खेळाडू विमानतळावरून निघून गेले. सर्व खेळाडूंनी ट्रॉफीसह खुल्या बसमधून चाहत्यांना ट्रॉफी दाखवली. बसवर ‘चॅम्पियन्स ऑफ द वर्ल्ड’ असे लिहिले होते.

स्टार फुटबॉलपटू मेस्सीने रविवारी फिफा विश्वचषक फायनलमध्ये गतविजेत्या फ्रान्सचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ असा पराभव केला. तत्पूर्वी, पूर्ण वेळेत २-२ आणि अतिरिक्त वेळेत ३-३ अशी बरोबरी होती. अंतिम फेरीत मेस्सीने आजपर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली. त्याने दोन गोल केले. या विश्वचषकात मेस्सीने एकूण सात गोल केले.

विश्वचषकात मेस्सीच्या एकूण गोलांची संख्या १३ झाली आहे. तो अर्जेंटिनासाठी वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक गोल करणारा खेळाडूही ठरला. अंतिम फेरीत मैदानात उतरताच मेस्सीने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला. विश्वचषकात सर्वाधिक सामने (२६) करणारा तो खेळाडूही ठरला. मेस्सीचा हा पाचवा विश्वचषक होता. अर्जेंटिनाचा संघ तिसऱ्यांदा विश्वविजेता ठरला आहे. यापूर्वी १९८६ आणि १९७८ मध्ये या संघाने फुटबॉल विश्वचषक जिंकला होता. विश्वचषक जिंकून अर्जेंटिना ज्या बसमध्ये पोहोचला त्या बसमध्ये तीन तारे लावण्यात आले होते. हे तीन स्टार तीन वर्ल्डकपचे प्रतिनिधित्व करतात.