परत ये, परत ये!

भर पावसात मेस्सी समर्थकांचा आर्जवी मोर्चा

भर पावसात मेस्सी समर्थकांचा आर्जवी मोर्चा

परत ये, परत ये.. हाच पुकार ते करीत होते. भर पावसात शेकडो लिओनेल मेस्सी समर्थक राजधानीतील मोच्र्यात मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. मेस्सीच्या धक्कादायक निवृत्तीमुळे निराश झालेल्या या समर्थकांनी त्याने राष्ट्रीय संघात पुन्हा सामील व्हावे, अशी मागणी केली.

गेल्या आठवडय़ात अमेरिकेत झालेल्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पध्रेच्या अंतिम फेरीत चिलीकडून झालेल्या पराभवानंतर अर्जेटिनाच्या मेस्सीने निवृत्ती पत्करली. यानंतर समाजमाध्यमांवर क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, कलावंत आणि राजकीय मंडळींनी मोठय़ा प्रमाणात पाठिंबा दिला. शनिवारी पावसामुळे थंडगार वातावरण झाल्यामुळे या मोच्र्याला देशव्यापी प्रतिसाद मिळू शकला नाही.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Lionel messi buenos aires rally pleads for argentinas football hero to return