Lionel Messi Retirement: अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी लवकरच फुटबॉलमधून निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. यापूर्वीही अनेकदा असे तर्क वितर्क लावण्यात आले होते मात्र यावेळेस स्वतः मेस्सीनेच असे संकेत दिले आहेत. 2022 मध्ये कतारमध्ये होणारी विश्वचषक ही त्याच्या कारकिर्दीतील शेवटची मोठी स्पर्धा असेल, असे मेस्सीने म्हटले आहे. एका मुलाखतीच्या दरम्यान मेस्सीने याबाबत पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना पुढील ४ वर्षांनंतर होणाऱ्या विश्वचषकाचा आपण भाग नसू असा संकेत देत उत्तर दिले आहे.

पत्रकाराने मुलाखतीच्या दरम्यान मेस्सीला त्याच्या कतार विश्वचषक हा शेवटचा ठरू शकतो का असा थेट प्रश्न केला होता यावर मेस्सीने सरळ हो, हे अगदी शेवटचे आहे असे म्हणत उत्तर दिले. त्यावर तो म्हणाला, होय, हे अगदी शेवटचे आहे. माझ्या कारकिर्दीतील हा शेवटचा विश्वचषक असेल. मी या विश्वचषकाचे आतुरतेने वाट पाहत आहेच पण माझया खेळाबाबत थोडा चिंतीत आहे कारण यंदा अनेक उत्तम खेळणारे संघ मैदानात आहेत. यंदा कतारमध्ये विश्वचषक होणार असून पुढील फूटबॉल विश्वचषक हे २०२६ मध्ये खेळवले जाणार आहे. मेस्सी सध्या ३९ वर्षाचा असल्याने पुढील विश्वचषकाच्या आधीच तो अधिकृत निवृत्तीची घोषणा करणार असल्याची दाट शक्यता आहे.

मेस्सीच्या करिअरची झलक..

मेस्सी हा आंतरराष्ट्रीय फूटबॉलमध्ये सर्वात प्रभावी खेळाडू आहे. आजपर्यंत बार्सिलोना व अर्जेंटिनाकडून खेळताना त्याने चमकदार कामगिरी केली आहे. अर्जेंटिनाकडून त्याने 90 गोल केले आहेत. 2004 ते 2021 अशा १७ वर्षात त्याने संघासाठी ५२० सामने खेळून त्यात ४७४ गोल केले आहेत. मेस्सी सध्या जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर आहे. मेस्सीच्या लाखो चाहत्यांनी आतापासूनच सोशल मीडियावर निवृत्तीवरून खेद व्यक्त करायला सुरुवात केली आहे.