वृत्तसंस्था, ब्युनोस : आयर्स छवयाच्या ३५ व्या वर्षी विश्वचषक जिंकण्याचे अठरा वर्षांचे स्वप्न पूर्ण करणारा फुटबॉल विश्वाचा अनभिषिक्त सम्राट अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेसीने सोमवारी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. वाढत्या वयात शरीर म्हणावी तेवढी साथ देत नसल्यामुळे मेसीने हा निर्णय घेतला असला, तरी जगभरातील असंख्य चाहत्यांना या निर्णयाने धक्का बसला आहे.
कारकीर्दीत आठ वेळा प्रतिष्ठेचा बॅलन डी’ ओर किताब मिळविणारा मेसी हा अर्जेंटिनासाठी सर्वाधिक सामने आणि गोल करणारा खेळाडू असून, त्याने २०२२ मध्ये कतार मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत राष्ट्रीय संघासोबतचे आपले गुंतागुंतीचे नाते एका महान यशात आणि विश्वविजेतेपदात बदलले. तेव्हापासूनच मेसीच्या निवृत्तीची चर्चा सुरू होती. मात्र, त्यानंतरही चार वर्षांनी २०२६ मध्ये मेसी वयाच्या ३९व्या वर्षी पुन्हा एकदा अर्जेंटिनासाठी विश्वचषक स्पर्धेत खेळण्यास सज्ज झाला आणि संघाला पुन्हा एकदा विश्वविजेतेपदापर्यंत नेले. आपल्या सहाव्या विश्वचषक स्पर्धेत कारकीर्दीचा एक विलक्षण शेवटचा अध्याय पूर्ण करण्याच्या आशेने तो मैदानात उतरला… पण, स्पेनविरुद्धच्या ०-१ अशा पराभवामुळे मेसीला तो स्वप्नवत शेवट करता आला नाही. आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत हाच अंतिम सामना त्याचा अखेरचा ठरला.
दु:खद निर्णय
इन्स्टाग्राम या समाजमाध्यमावरुन निवृत्तीची घोषणा करताना एक दु:ख देणारा निर्णय असे म्हटले आहे. ‘‘निवृत्तीचा निर्णय घेतल्यानंतरही मनाच्या आत कुठेतरी ते दु:ख अजूनही होत आहे. परंतु आता ती वेळ आली आहे हे देखिल समजले. मी नेहमीच सर्वस्व दिले. केवळ गेल्या काही वर्षांत जिंकलो तेव्हाच नाही, तर त्यापूर्वीही राष्ट्रीय संघासाठी खेळलो तेव्हा या जर्सीसाठी, तुम्हाला आनंद देण्यासाठी आणि फुटबॉलच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना अर्जेंटियन असल्याचा अभिमान वाटावा म्हणून कायम मैदानावर पूर्ण ताकदीने लढलो,’’ असे मेसीने आपल्या संदेशात म्हटले आहे. मी या शांततेने आणि अभिमानाने निवृत्त होत आहे की माझ्या सहकार्यांसह तुम्हाला असे क्षण दिले आहेत की ज्यांचे आपण कधी फक्त स्वप्न पाहिले होते, असेही मेसीने आपल्या संदेशात पुढे म्हटले आहे.
२१ जुलै रोजीच घेतला निर्णय
विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या दोन दिवसांनंतर म्हणजे २१ जुलै रोजीच आपण निवृत्ती पत्र लिहून तयार ठेवले होते. मात्र, वडील आरोग्याच्या गंभीर समस्यांशी झुंजत असल्यामुळे आपण तेव्हा जाहीर केले नव्हते, असेही मेसीने आपल्या संदेशाच्या अखेरीस म्हटले आहे. मेसीचे वडील जॉर्ज यांचे ८ ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यानंतर पुरेसा वेळ घेत मेसीने सोमवारी निवृत्तीची घोषणा केली.
क्लब फुटबॉल खेळणार
आंतरराष्ट्रीय प्रवास थांबला असला, तरी मेसीचा हा व्यावसायिक प्रवास कायम राहणार आहे. आपण क्लब फुटबॉल खेळणार असल्याचे मेसीने स्पष्ट केले आहे.
अर्जेंटिनासाठी विजेतीपदे
- ‘फिफा’ विश्वचषक २०२२
- कोपा अमेरिका २०२१, २०२४
- फिनालिसिमा २०२२
- ऑलिम्पिक सुवर्णपदक २००८
- ‘फिफा’ २० वर्षांखालील विश्वचषक २००५
मेसीचे विक्रम
- विश्वचषक स्पर्धेत दुसरे सर्वाधिक २१ गोल
- फुटबॉल विश्वात आंतरराष्ट्रीय स्तरावर ६८ गोलसाठी सहाय्य
- अर्जेंटिनासाठी खेळताना ११ वेळा हॅटट्रिक
- २०२२ मध्ये इस्टोनियाविरुद्धच्या एका मैत्रीपूर्ण सामन्यात मेसीने एकट्याने पाच गोल केले होते.
आदराचे स्थान
या वर्षीच्या विश्वचषक अंतिम सामन्यात स्पेनविरुद्ध झालेल्या पराभवामुळे मेसीला एका स्वप्नवत निरोपाची संधी मिळाली नाही, परंतु जगातील महान खेळाडूंमधील त्याचे आदराचे स्थान खूप आधीच निश्चित झाले होते. अर्जेंटिनासाठी २००५ मध्ये पदार्पण करणारा मेसी १९८६ नंतर अर्जेंटिनाला विश्वविजेता बनणारा दुसरा कर्णधार ठरला होता. तेव्हा दिएगो मॅराडोना पहिले कर्णधार होते. त्यानंतर त्यांच्या सावलीतून बाहेर पडत मेसीने देशाच्या फुटबॉल इतिहासातील एक युगप्रवर्तक खेळाडू म्हणून स्वत:चा एक वेगळा आणि महान वारसा निर्माण केला.
अर्जेंटिनासह २०१४ च्या विश्वचषक अंतिम सामन्यातील पराभव आणि सलग दोन कोपा अमेरिका अंतिम लढतीतील अपयशासारख्या अनेक वर्षांच्या निराशेनंतर, मेसीने शेवटी २०२१ मध्ये आपली पहिली मोठी आंतरराष्ट्रीय कोपा अमेरिका चषक जिंकला. त्यानंतर २०२२ च्या कतार विश्वचषकात त्याने आपल्या देशाला ऐतिहासिक विजेतेपद मिळवून दिले.
गोल वर्गीकरण
५३ आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामन्यात केलेले गोल
३६ विश्वचषक पात्रता फेरीतील गोल
२१ विश्वचषक स्पर्धेत २६ सामन्यांत २१ गोल
१४ कोपा अमेरिका स्पर्धेतील गोल
०१ सुपरक्लासिको डी लास अमेरिका स्पर्धेतील गोल
आंतरराष्ट्रीय कारकीर्द
२०७ सामने
१२५ गोल
६८ साहाय्य
मेसीने कारकीर्दीत आठ वेळा फुटबॉल विश्वातील प्रतिष्ठेचा ‘बॅलन डी’ओर’ किताब मिळविला. यामध्ये २००९ ते २०१२ सलग चार वर्षे, त्यानंतर २०१५, २०१९, २०२१ आणि २०२३ मध्ये.
