स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाचा संघ आपल्या ‘ड्रीम फायनल’ मध्ये पोहोचला आहे. उपांत्य फेरीत त्यांनी क्रोएशियाचा ३-० असा पराभव केला. २०१४ नंतर अर्जेंटिनाचा संघ प्रथमच अंतिम फेरीत पोहोचला आहे. जेतेपदाच्या लढतीत त्याचा सामना फ्रान्स आणि मोरोक्को यांच्यातील उपांत्य फेरीतील विजेत्याशी होईल. अंतिम सामना १८ डिसेंबर रोजी होणार आहे.

मेस्सीने एक विक्रम केला

क्रोएशियाविरुद्धच्या सामन्यात अर्जेंटिनाच्या संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक फुटबॉल खेळला. ३४ व्या मिनिटाला क्रोएशियन खेळाडूंनी ज्युलियन अल्वारेझच्या बॉक्समध्ये जेव्हा फाऊल केला तेव्हा त्याचा फायदा अर्जेंटिनाने उचलला. रेफ्रींनी अर्जेंटिनाला पेनल्टी देऊ केली आणि त्यावर लिओनेल मेस्सीने सुरेख गोल केला. या गोलच्या जोरावर मेस्सीने इतिहास रचला. तो फिफा विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिनासाठी सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला.

IPL 2024 RR vs PBKS Match Updates in marathi
PBKS vs RR : युजवेंद्र चहलला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी! IPL मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरणार पहिलाच गोलंदाज
Rr Vs Gt Ipl 2024 Sanju Samson 50th Match As Captain
RR vs GT : संजू सॅमसनने ५०व्या सामन्यात केला खास पराक्रम, ‘या’ बाबतीत रोहित शर्मासह तीन कर्णधारांना टाकले मागे
Shanshak Singh Performance in IPL 2024
IPL 2024 मध्ये ‘या’ खेळाडूने प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना फोडलाय घाम, ५ डावात फक्त एकदाच झालाय आऊट
Abhishek Sharma Breaks Chris Gayle and Sunil Narine's Record in SRH vs CSK Match
SRH vs CSK : अभिषेकने वादळी खेळीच्या जोरावर मोडला गेल-नरेनचा विक्रम, IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज

मेस्सीने वर्ल्ड कपमध्ये एकूण ११ गोल केले आहेत

मेस्सीचा हा पाचवा विश्वचषक असून त्याने आतापर्यंत एकूण ११ गोल केले आहेत. यानुसार मेस्सीने अर्जेंटिनाचा माजी खेळाडू गॅब्रिएल बॉटिस्टा याचा विक्रम मोडला. विश्वचषकात बॉटिस्टाने एकूण १० गोल केले होते. या विश्वचषकात मेस्सीने अर्जेंटिनाला स्वबळावर अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवले आहे. या विश्वचषकात त्याने एकूण पाच गोल केले आहेत. त्याने पहिला गोल सौदी अरेबियाविरुद्ध, दुसरा मेक्सिकोविरुद्ध (दोन्ही गट टप्प्यात), तिसरा ऑस्ट्रेलियाविरुद्ध उपउपांत्यपूर्व फेरीत, चौथा उपांत्यपूर्व फेरीत नेदरलँडविरुद्ध आणि पाचवा उपांत्य फेरीत क्रोएशियाविरुद्ध केला आहे.

हेही वाचा: Andrew Flintoff: चित्रीकरणादरम्यान कार अपघातानंतर अँड्र्यू फ्लिंटॉफला गंभीर दुखापत! एअरलिफ्ट करून केले रुग्णालयात दाखल

गोल्डन बूटच्या शर्यतीत मेस्सी

पोलंडविरुद्धचा गट सामना वगळता प्रत्येक सामन्यात मेस्सीने एक गोल केला आहे. मेस्सीने अंतिम १६ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध गोल करताना एक पराक्रम केला. विश्वचषकाच्या बाद फेरीत त्याने प्रथमच गोल केला. मेस्सी सध्या पाच गोलांसह गोल्डन बूटच्या शर्यतीत कायलियन एमबाप्पेसह संयुक्त नंबर एक वर आहे.

विश्वचषकात मेस्सीने सर्वाधिक सामने खेळले आहेत

मेस्सीने लुसेल स्टेडियमवर क्रोएशियाविरुद्ध मैदानात उतरताच विश्वचषकात सर्वाधिक सामने खेळण्याच्या बाबतीत जर्मनीच्या लोथर मॅथॉसची बरोबरी केली. मेस्सीचा हा विश्वचषकातील २५ वा सामना होता आणि मॅथ्यूसनेही तेवढेच सामने खेळले आहेत. याशिवाय मेस्सी ब्राझीलच्या महान पेलेचा विक्रम मोडण्यापासून केवळ दोन गोल दूर आहे. पेलेने विश्वचषकामध्ये एकूण १२ गोल केले आहेत. तर मेस्सीने सध्या ११ गोल केले आहेत. मेस्सीला अंतिम फेरीत पेलेला मागे टाकायला नक्की आवडेल.

हेही वाचा: FIFA WC 2022: मेस्सी-एमबाप्पेला मोठी संधी! गेल्या ४४ वर्षात फक्त ‘हा’ खेळाडूच ६+ गोल करून ठरला होता गोल्डन बूटचा मानकरी

क्लोसने विश्वचषकामध्ये सर्वाधिक गोल केले

विश्वचषकात एकूण सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम जर्मनीचा माजी स्ट्रायकर मिरोस्लाव क्लोसच्या नावावर आहे. क्लोजने आपल्या कारकिर्दीत विश्वचषकात १६ गोल केले. ब्राझीलचा रोनाल्डो १५ गोलांसह दुसऱ्या, जर्मनीचा गेर्ड मुलर १४ गोलांसह तिसऱ्या आणि फ्रान्सचा जस्ट फॉन्टेन १३ गोलांसह चौथ्या स्थानावर आहे. मेस्सीने जर गोल्डन बूट जिंकला तर तो त्याच्या कारकिर्दीतील पहिला वर्ल्डकप गोल्डन बूट ठरेल.

१९८६ नंतर अर्जेंटिनाला पहिला विश्वचषक मिळवून द्यावा, अशीही मेस्सीची इच्छा आहे. १९८६ मध्ये मॅराडोनाच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने शेवटचा विश्वचषक जिंकला होता. संघ दोन वेळा चॅम्पियन ठरला आहे. २०१४ मध्ये अर्जेंटिनाचा संघ अंतिम फेरीत पोहोचला होता, मात्र जर्मनीविरुद्धच्या विजेतेपदाच्या लढतीत त्यांना १-० असा पराभव स्वीकारावा लागला होता. आठ वर्षांनंतर संघाने पुन्हा अंतिम फेरी गाठली आहे. पाच विश्वचषक विजेतेपदांसह ब्राझील आघाडीवर आहे. त्याचबरोबर इटली आणि जर्मनीने प्रत्येकी चार वेळा विश्वचषक जिंकला आहे.