Lionel Messi World Record in FIFA WC 2026: लिओनेल मेस्सी पुन्हा जागतिक फुटबॉलमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवला आहे. लिओनेल मेस्सीने फुटबॉलच्या विश्वात पुन्हा एकदा एक उल्लेखनीय कामगिरी करत स्वतःला या खेळातील महान खेळाडूंच्या अग्रस्थानी नेलं आहे. २२ जूनला डॅलस येथे अर्जेंटिना आणि ऑस्ट्रिया यांच्यात झालेल्या एका रोमांचक सामन्यादरम्यान मेस्सीने इतिहास घडवला. या सामन्यात एक शानदार गोल करून, मेस्सी आता फिफा (FIFA) विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणारा खेळाडू बनला आहे.

अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने सोमवारी फुटबॉल विश्वचषकात सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम केला आणि एकूण १७ गोल्स आपल्या नावे केला आहे. ऑस्ट्रियाविरुद्धच्या सामन्यात पेनल्टी किकवर गोल करण्यात अपयश आल्यानंतर साधारण अर्ध्या तासानेच त्याने ही कामगिरी करून दाखवली. अर्जेंटिना आणि ऑस्ट्रिया यांच्यातील विश्वचषक सामन्याच्या ३८ व्या मिनिटाला मेस्सीने हा गोल केला. मेस्सीने गोल करण्याची ही सलग सहावी विश्वचषक लढत ठरली आहे. याच सामन्यात मेस्सीने अजून एक गोल केला. पेनल्टीमधील मेस्सीचा गोल हुकल्याने त्याची सलग दुसरी विश्वचषक हॅटट्रिक करण्यात तो अपयशी ठरली.

लिओनेल मेस्सीने इतिहास घडवला

३८ वर्षीय लिओनेल मेस्सीने विश्वचषकातील आपला १७वा गोल करत जर्मनीचा महान खेखाडू मिरोस्लोव क्लोस याचा १६ गोल्सचा विक्रम मोडला आहे. या फिफा विश्वचषकादरम्यान मेस्सी उत्कृष्ट लयीत आहे. सलग सहा फिफा विश्वचषक सामन्यांमध्ये गोल करण्याचा विक्रमही त्याच्या नावे आहे, त्यावरून त्याच्या या शानदार कामगिरीची प्रचिती येते. आता तो फ्रान्सचा जस्ट फॉन्टेन आणि ब्राझीलचा जैरझिन्हो यांसारख्या दिग्गज खेळाडूंच्या प्रतिष्ठित गटात सामील झाला आहे.

लिओनेल मेस्सीच्या नावावर आता फिफा विश्वचषकात सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम आहे; त्याने जर्मनीचा दिग्गज खेळाडू मिरोस्लाव क्लोस (१६ गोल) याचा विक्रम मागे टाकला आहे. या यादीत ब्राझीलचा प्रसिद्ध खेळाडू रोनाल्डो १५ गोल्ससह तिसऱ्या स्थानावर आहे. दरम्यान, फ्रान्सचा कायलिन एमबाप्पे आणि जर्मनीचा गर्ड मुलर प्रत्येकी १४ गोल करून संयुक्तपणे चौथ्या स्थानावर आहेत. भविष्यात एमबाप्पे मेस्सीचा हा विक्रम मोडू शकतो.

२०२६ च्या फिफा विश्वचषकापूर्वी, लिओनेल मेस्सीने पाच विश्वचषक स्पर्धांमध्ये एकूण १३ गोल केले होते. या स्पर्धेतील आपल्या पहिल्याच सामन्यात अल्जेरियाविरुद्ध शानदार हॅट्ट्रिक साधत त्याने जर्मनीच्या मिरोस्लाव क्लोजच्या १६ गोल्सच्या विक्रमाशी बरोबरी केली. त्यानंतर, सोमवारी ऑस्ट्रियाविरुद्ध आपला १७ वा गोल करून त्याने क्लोसला मागे टाकलं. तसेच, अल्जेरियाविरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरून, सहा वेगवेगळ्या फिफा विश्वचषक स्पर्धांमध्ये सहभागी होणारा मेस्सी जगातील पहिला खेळाडू ठरला.

फिफा विश्वचषक इतिहासात सर्वाधिक गोल करणारे खेळाडू

लिओनेल मेस्सी – अर्जेंटिना – १८ गोल
मिरोस्लोव क्लोज – जर्मनी – १६ गोल
रोनाल्डो – ब्राझील – १५ गोल
गर्ड मुलर – पश्चिम जर्मनी – १४ गोल
कायलिन एम्बाप्पे – फ्रान्स – १४ गोल