scorecardresearch

मेलबर्न कसोटी: पहिल्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलिया ५ बाद २५९

मेलबर्न कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणाऱया ऑस्ट्रेलिया संघाला सुरूवातीलाच भारतीय गोलंदाजांनी झटके दिले.

मेलबर्न कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणाऱया ऑस्ट्रेलिया संघाला सुरूवातीलाच भारतीय गोलंदाजांनी झटके दिले. सध्या फॉर्मात असलेल्या डेव्हिड वॉर्नरला शून्यावर माघारी धाडून उमेश यादवने भारताला चांगली सुरूवात मिळवून दिली. त्यानंतर वॉटसन आणि रॉजर्स यांनी संयमी फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनीही अर्धशतक ठोकले परंतु, त्यानंतर अश्विनने आपल्या फिरकी गोलंदाजीचा जलवा दाखवत वॉटसनला माघारी धाडले. पाठोपाठ रॉजर्स देखील मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. मार्श आणि जो बर्न्‍स यांनाही स्वस्तात बाद करण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. संघाच्या धावसंख्येला आकार देण्याची जबाबदारी ऑस्ट्रेलियाच्या कर्णधार स्मिथवर आली असून तो हॅडिनच्या साथीने संघाचा डाव सावरत संयमी खेळी करत आहे. भारताकडून उमेश यादव आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या तर फिरकीपटू अश्विनने एका फलंदाजाला बाद केले. पहिल्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ५ बाद २५९ अशी आहे. ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येची सरासरी पाहता एकंदर पहिला दिवस भारतासाठी समाधानकारक राहिला.
स्कोअरकार्ड-

 

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Live cricket score india vs australia 3rd test

ताज्या बातम्या