Live

India vs England, 1st T20 : भारताला पराभवाचा धक्का, इंग्लंडचा सात विकेट्सने विजय

इऑन मॉर्गन विजयाचा शिल्पकार

मॉर्गन बाद झाल्यानंतर जो रुटने संघाची कमान सांभाळत विजयाकडे कूच केली.

इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा धक्का बसला आहे. कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या पहिल्यावहिल्या आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामन्यात इंग्लंडने भारतावर सात विकेट्सने मात केली. भारताने दिलेले १४८ धावांचे आव्हान इंग्लंडने केवळ तीन विकेट्सच्या मोबदल्यात गाठले. या विजयासह इंग्लंडने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
इंग्लंडकडून कर्णधार इऑन मॉर्गन याने अर्धशतकी खेळी साकारली, तर जो रुटने नाबाद ४६ धावांची खेळी साकारून इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

इंग्लंडची सलामीजोडी जेसन रॉय आणि सॅम बिलिंग्ज यांनी तुफान फटकेबाजी करत चांगला धावा वसुल केल्या. आशिष नेहराच्या पहिल्या षटकात केवळ चार धावा केल्यानंतर दुसऱया षटकात बिलिंग्जने बुमराहला तब्बल २० धावा ठोकल्या. दोन षटकांच्या अखेरीस इंग्लंडच्या २४ धावा झाल्या होत्या. त्यानंतर आशिष नेहराच्याही षटकात फटकेबाजी सुरूच होती. मग युजवेंद्र चहल या युवा फिरकीपटूने आपल्या पहिल्याच षटकात दोघांनाही त्रिफळाचीत करून भारताला यश मिळवून दिले. चहलच्या पहिल्या दोन विकेट्समुळे भारताने सामन्यात कमबॅक केले होते. पण इंग्लंडचा भरवशाचा फलंदाज जो रुट आणि कर्णधार इऑन मॉर्गन यांनी मैदानात टीच्चून फलंदाजी करत बजावात्मक फलंदाजी केली. दोघांनी अर्धशतकी भागीदारी रचून संघाचा धावफलक हालता ठेवला. मॉर्गन यावेळी चांगला सुर गवसलेला पाहायला मिळाला. मॉर्गनने ३८ चेंडूत ५१ धावांची खेळी साकारली. यात चार खणखणीत षटकारांचा समावेश होता. मॉर्गन बाद झाल्यानंतर जो रुटने संघाची कमान सांभाळत विजयाकडे कूच केली. जो रुट देखील सामन्याच्या बुमराहच्या गोलंदाजीवर क्लीनबोल्ड झाला होता. पण बुमराहचा चेंडू नोबॉल असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे रुटला जीवनदान मिळाले होते.

तत्पूर्वी, इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. ट्वेन्टी-२० सा0मन्यासाठी भारतीय संघात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले होते. त्यानुसार सलामीसाठी यावेळी स्वत: कर्णधार विराट कोहली फलंदाजीसाठी आला होता. कोहली आणि केएल राहुल यांनी भारतीय डावाची सुरूवात केली. दोघांनी चांगली फलंदाजी करत ३४ धावांची भागीदारी केली होती. पण मोठा फटका मारण्याच्या नादात केएल राहुल(९) झेलबाद झाला. त्यानंतर सुरेश रैना आणि कोहली यांनी संघाच्या धावसंख्येला आकार देण्यास सुरूवात केली. पण इंग्लंडने गोलंदाजीत योग्य बदल करत मोईन अलीला गोलंदाजीसाठी पाचारण केले. मोईन अलीच्या पहिल्याच चेंडूवर भारताला दुसरा धक्का बसला. कोहली (२९) झेलबाद होऊन माघारी परतला. कोहली आणि लोकेश राहुल तंबूत दाखल झाल्यानंतर रैनाने कोणताही दबाव निर्माण न होऊ देता फटकेबाजी केली खरी पण दुसऱया बाजूला युवराज मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात केवळ १२ धावा करून तंबूत दाखल झाला. रैनाने सामन्यातील एकमेव षटकार खेचला मात्र, त्याच्या पुढच्याच चेंडूवर तो क्लीनबोल्ड देखील झाला. रैनाने ३४ धावा केल्या.

इंग्लंडच्या गोलंदाजांनी यावेळी हुशारीने गोलंदाजी करत धोनीच्या फटकेबाजीला रोखून धरले. टायमल मिल्स आणि जॉर्डन यांनी स्लोवर वन्सच्या मदतीने अप्रतिम गोलंदाजी केली. मनिष पांडे तर आल्यापावली पायचीत होऊन माघारी परतला. हार्दिक पंड्या देखील झेलबाद झाला. अखेरच्या षटकात धोनीने लागोपाठ दोन चौकार ठोकले खरे पण तोवर खूप उशीर झाला होता. इंग्लंडकडून चार षटकात २१ धावा देऊन दोन महत्त्वपूर्ण विकेट्स घेणाऱया मोईन अली याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

 India vs England :  सामन्याचे संपूर्ण अपडेट्स

Live Updates
2:08 (IST) 26 Jan 2017
इंग्लंडला विजयासाठी १२ चेंडूत केवळ १ धाव आवश्यक
2:07 (IST) 26 Jan 2017
जो रुटचा आणखी एक चौकार, इंग्लंडला विजयासाठी फक्त दोन धावांची गरज
2:06 (IST) 26 Jan 2017
जो रुटचा दमदार चौकार
2:02 (IST) 26 Jan 2017
इंग्लंडला विजयासाठी १८ चेंडूत १६ धावांची गरज
2:02 (IST) 26 Jan 2017
फ्री हीटवरही जो रुट क्लीनबोल्ड
2:02 (IST) 26 Jan 2017
बुमराहने टाकलेला चेंडू नो बॉल असल्याचे निष्पन्न झाल्याने जो रुटला जीवनदान
2:00 (IST) 26 Jan 2017
इंग्लंडची चौथी विकेट, जो रुट क्लीनबोल्ड
1:55 (IST) 26 Jan 2017
इंग्लंडला विजयासाठी २६ चेंडूत २० धावांची गरज
1:54 (IST) 26 Jan 2017
परवेझ रसूलने घेतली इऑन मॉर्गनची विकेट
1:53 (IST) 26 Jan 2017
भारताला मोठे यश, इऑन मॉर्गन ५१ धावांवर झेलबाद
1:51 (IST) 26 Jan 2017
इंग्लंडला विजयासाठी ३० चेंडूत २८ धावांची गरज
1:49 (IST) 26 Jan 2017
इऑन मॉर्गनचा षटकार सुरेश रैनाने सीमारेषेवर अप्रतिम क्षेत्ररक्षणाने रोखला
1:47 (IST) 26 Jan 2017
इंग्लंडला विजयासाठी ३६ चेंडूत ३४ धावांची गरज
1:46 (IST) 26 Jan 2017
इऑन मॉर्गनचा खणखणीत षटकार
1:44 (IST) 26 Jan 2017
इंग्लंडला विजयासाठी ४२ चेंडूत ४५ धावांची गरज
1:38 (IST) 26 Jan 2017
मॉर्गन आणि रुटची ४८ चेंडूत ५० धावांची भागीदारी
1:38 (IST) 26 Jan 2017
सुरेश रैनाच्या गोलंदाजीवर मॉर्गनचा खणखणीत षटकार
1:36 (IST) 26 Jan 2017
हार्दिक पंड्याच्या षटकात ६ धावा
1:32 (IST) 26 Jan 2017
इंग्लंडला विजयासाठी ६० चेंडूत ७२ धावांची गरज
1:30 (IST) 26 Jan 2017
१० षटकांच्या अखेरीस इंग्लंड २ बाद ७६ धावा
1:29 (IST) 26 Jan 2017
मॉर्गनचा खणखणीत षटकार
1:28 (IST) 26 Jan 2017
युजवेंद्र चहलला जो रुटचा कव्हर्सवर चौकार
1:27 (IST) 26 Jan 2017
९ षटकांच्या अखेरीस इंग्लंड २ बाद ६४ धावा
1:26 (IST) 26 Jan 2017
बुमराहचेही कमबॅक, पहिल्या षटकात २० धावा दिल्यानंतर दुसऱया षटकात दिल्या केवळ २ धावा
1:23 (IST) 26 Jan 2017
इंग्लंडला विजयासाठी ७२ चेंडूत ८६ धावांची गरज
1:22 (IST) 26 Jan 2017
८ षटकांच्या अखेरीस इंग्लंड २ बाद ६२ धावा
1:22 (IST) 26 Jan 2017
सुरेश रैनाच्या षटकात पाच धावा
1:21 (IST) 26 Jan 2017
सुरेश रैनाच्या तीन चेंडूत तीन धावा
1:20 (IST) 26 Jan 2017
गोलंदाजीत बदल, सुरेश रैना टाकतोय षटक
1:19 (IST) 26 Jan 2017
७ षटकांच्या अखेरीस इंग्लंड २ बाद ५७ धावा
1:17 (IST) 26 Jan 2017
परवेझ रसूलच्या गोलंदाजीवर मॉर्गनचा इनसाईड आऊट फटका, चौकार
1:15 (IST) 26 Jan 2017
युजवेंद्रकडून आणखी एक सुंदर षटक, केवळ दोन धावा
1:12 (IST) 26 Jan 2017
परवेझ रसूलकडून चांगली गोलंदाजी, पहिल्या षटकात केवळ ३ धावा
1:10 (IST) 26 Jan 2017
इंग्लंडचा घातक बिलिंग्ज क्लीनबोल्ड, चहलच्या एकचा षटकात इंग्लंडच्या दोन विकेट्स
1:09 (IST) 26 Jan 2017
चहलच्या खात्यात आणखी एक विकेट
1:04 (IST) 26 Jan 2017
दुसऱया चेंडूवर चहलने मिळवून दिले पहिले यश, रॉय क्लीनबोल्ड
1:04 (IST) 26 Jan 2017
चहलच्या पहिल्याच चेंडूवर रॉयचा षटकार
1:03 (IST) 26 Jan 2017
गोलंदाजीत बदल, युजवेंद्र चहलला गोलंदाजीसाठी पाचारण
12:58 (IST) 26 Jan 2017
नेहराच्या पहिल्याच चेंडूवर रॉयचा खणखणीत षटकार
12:55 (IST) 26 Jan 2017
बिलिंग्जची तुफान फटकेबाजी, बुमराहच्या षटकात २० धावा
12:53 (IST) 26 Jan 2017
बिग्लिंगचा आणखी एक चौकार
12:52 (IST) 26 Jan 2017
बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर बिलिंग्जचा चौकार
12:51 (IST) 26 Jan 2017
पहिल्या षटकात इंग्लंड बिनबाद ४ धावा
12:51 (IST) 26 Jan 2017
आशिष नेहराने टाकले पहिले षटक
12:50 (IST) 26 Jan 2017
इंग्लंडच्या फलंदाजीला सुरूवात
12:37 (IST) 26 Jan 2017
इंग्लंडने भारताला १४७ धावांपर्यंत रोखलं
12:36 (IST) 26 Jan 2017
२० षटकांच्या अखेरीस भारत ७ बाद १४७ धावा
12:34 (IST) 26 Jan 2017
परवेझ रसूल धावचीत
12:32 (IST) 26 Jan 2017
तिसऱया चेंडूवर धोनीचा आणखी एक चौकार
12:31 (IST) 26 Jan 2017
दुसऱया चेंडूवर खणखणीत चौकार

Web Title: Live cricket score india vs england ind vs eng 1st t20 live streaming kanpur

ताज्या बातम्या