लंडन : लिव्हरपूलने पेनल्टी शूटआऊटमध्ये चेल्सीला ६-५ अशा फरकाने पराभूत करत एफए चषक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद मिळवले.

वेम्बली स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात दोन्ही संघांनी चांगला खेळ केला; पण त्यांना गोल करण्यात अपयश आले. अखेरीस पेनल्टी शूटआऊटमध्ये कोस्टास त्सिमिकासने निर्णायक गोल करत लिव्हरपूलला विजय मिळवून दिला. लिव्हरपूलला २००६ नंतर पहिल्यांदाच एफए चषकाचे जेतेपद मिळाले. एफए चषकाच्या अंतिम सामन्यात विजेता ठरवण्यासाठी पेनल्टी शूटआऊट झाले. दोन्ही संघ पेनल्टी शूटआऊटमध्ये ५-५ असे बरोबरीत होते. मात्र, संघाच्या सातव्या प्रयत्नात चेल्सीचा मध्यरक्षक मेसन माऊंटला पेनल्टीला गोलमध्ये रूपांतरित करण्यात यश आले नाही. याउलट त्सिमिकासने चेंडू गोलजाळय़ात मारत लिव्हरपूलला विजय मिळवून दिला.