दिलीप वेंगसरकर

मुंबई : वि. वि. करमरकर हे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आणि उत्तम क्रीडा समीक्षक. प्रत्येक सामना बारकाईने बघणे आणि त्याचे सखोल, माहितीपूर्ण व अप्रतिम विश्लेषण करणे ही त्यांची खासियत होती. त्यांनी खेळांच्या बातम्यांसाठी वृत्तपत्रामध्ये कधीही जागा कमी पडू दिली नाही. मात्र त्याबरोबरच खेळांच्या प्रसारासाठी, सुधारणेसाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले.

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
MPSC Mantra Increasing Opportunities in Public Service Commission Competitive Exams
MPSC मंत्र: लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा- वाढत्या संधी
panvel dr sujay vikhe patil marathi news,
पारनेरचा प्रचार कामोठेमध्ये
chhagan bujbal
“माझा निर्णय दिल्लीतून ठरला, मात्र…”; नाशिकच्या उमेदवारीबाबत छगन भुजबळांचे विधान

 वृत्तपत्रात क्रीडा पानाला विशेष महत्त्व आले, त्याचे श्रेय वि. वि. करमकर यांचे आहे. त्यांनी लिहिलेले लेख हे कायमच वाचनीय असायचे. त्या लेखांमध्ये सखोल माहिती असली, तांत्रिक गोष्टी असल्या, तरी ते अतिशय सोप्या भाषेत असायचे. खेळांविषयी फारशी माहिती नसलेल्या व्यक्तीही त्यांनी लिहिलेला मजकूर आवर्जून वाचायचे. करमरकर यांनी केवळ क्रिकेटच नव्हे; तर कबड्डी, खो-खो यांसारख्या आपल्या मातीतील खेळांनाही तितकेच महत्त्व दिले. त्यांनी लिहिलेल्या लेखांमुळे खेळाडूंना प्रोत्याहन मिळायचे. क्रीडा संघटनांमधील गैरकारभारालाही त्यांनी वाचा फोडली. खेळाडूंवर अन्याय होत असल्यास त्याबाबतही ते रोखठोक भूमिका मांडायचे. त्यांनी मांडलेल्या मतांची अगदी सर्वोच्च स्तरापर्यंत दखल घेतली जायची.

मी माझ्या कारकीर्दीदरम्यान दादरच्या हिंदू कॉलनीमध्ये राहायचो. त्या काळात करमरकर यांच्याशी अनेकदा भेटी-गाठी झाल्या. अनेकदा मुलाखत घेण्यासाठी ते माझ्या घरीही यायचे. सामन्यांचे वार्ताकन करताना प्रत्येक बारकावे ते टिपत असत. छोटे-मोठे सामने पाहण्यासाठी ते आवर्जून मैदानावर उपस्थित राहायचे. सामन्याची खेळपट्टी कशी आहे इथपासून ते मंडळाच्या पदाधिकाऱ्यांबद्दलही ते वार्ताकन करताना लिहीत असत. मुंबई क्रिकेट पुढे जावे, यासाठी त्यांनी दिलेले सक्रिय योगदान कधीही विसरण्याजोगे  नाही. आयुष्याच्या अखेपर्यंत क्रीडा पत्रकारितेशी नाळ जोडून राहिलेल्या या अवलियास भावपूर्ण आदरांजली!