IRE vs OMA Lorcan Tucker Creates History: टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये १४ फेब्रुवारीला आज सामना आयर्लंड आणि ओमान यांच्यात खेळवला जात आहे. या सामन्यात आयर्लंड संघाने ऐतिहासिक खेळी केली आहे. आयर्लंड संघाने प्रथम फलंदाजी करताना यंदाच्या टी-२० विश्वचषकातील सर्वात मोठी धावसंख्या उभारली आहे. आयर्लंडचा कर्णधार लॉर्कन टकर यांनी वादळी खेळी साकारत संघाला तब्बल २३५ धावांचा आकडा गाठला. यादरम्यान लॉर्कन टकरने मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.
कोलंबोमध्ये होत असलेल्या या सामन्याची नाणेफेक ओमानने जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, पण आयर्लंडने मात्र वादळी फलंदाजी करत संघाच्या गोलंदाजांची धुलाई केली. आयर्लंडची सुरूवात मात्र खूप खराब झाली. आयर्लंडचा नियमित कर्णधार पॉल स्टर्लिंग याच्या हॅमस्ट्रिंगला दुखापत झाल्याने तो स्पर्धेतून बाहेर झाला. त्याच्या जागी लॉर्कन टकरला संघाची जबाबदारी देण्यात आली आणि त्याने या सामन्यात ९४ धावांची सर्वाेत्कृष्ट खेळी साकारली.
आयर्लंडचे सुरूवातीचे ३ फलंदाज अनुक्रमे ५, १४, १४ धावा करत बाद झाले. पण यानंतर आलेल्या यष्टीरक्षक कर्णधार लॉर्कन टकर याने हाहाकार केला. टकरने अवघ्या ५१ चेंडूत १० चौकार व ४ षटकारांसह नाबाद ९४ धावांची खेळी केली. टकरचं शतक हुकलं असलं तरी त्याने संघासाठी सर्वात मोठी खेळी साकारली. लॉर्कन टकर हा आयर्लंडसाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी करणारा पहिला फलंदाज ठरला आहे.
आयर्लंडसाठी टी-२० विश्वचषकात सर्वाधिक वैयक्तिक धावांची खेळी करणारे फलंदाज
९४* धावा, लोर्कन टकर विरुद्ध ओमान, कोलंबो एसएससी २०२६
७२* धावा, कर्टिस कॅम्फर विरुद्ध स्कॉटलंड, होबार्ट २०२२
७१* धावा, लोर्कन टकर विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ब्रिस्बेन २०२२
६६* धावा, पॉल स्टर्लिंग विरुद्ध वेस्ट इंडिज, होबार्ट २०२२
आयर्लंडने ओमान संघाविरूद्ध खेळताना २३५ धावांचा मोठा आकडा गाठला. लॉर्कन टकरने ९४ धावांची खेळी केली. याशिवाय ग्रेथ डिलानी याने ३० चेडूत ३ चौकार व ४ षटकारांसह ५६ धावा केल्या. तर जॉर्ज डॉकरेलने ९ चेंडूत ५ षटकारांसह ३५ धावांची धुव्वाधार खेळी केली. अखेरच्या षटकात त्याने षटकारांची हॅटट्रिक केली. यासह आयर्लंडने टी-२० इतिहासातील त्यांची सर्वात मोठी धावसंख्या उभारली.
आयर्लंडसाठी सर्वाधिक टी-२० मधील सर्वात मोठी धावसंख्या
२३५/५ विरुद्ध ओमान कोलंबो, एसएससी २०२६ *
२२६/४ विरुद्ध ऑस्ट्रिया, एडिनबर्ग २०२३
२२५/७ विरुद्ध अफगाणिस्तान, अबू धाबी २०२३
२२१/५ विरुद्ध भारत, मालाहाइड २०२२
