भारताची बॉक्सिंगपटू लव्हलिना बोर्गोहाइन आज ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावलं. सुवर्णपदकापासून अवघे दोन विजय दूर असणाऱ्या लव्हलिनाचा उपांत्य फेरीत पराभव झाला.  उपांत्य फेरीत जगज्जेत्या बुसेनाझ सुर्मेनेलीने लव्हलिनाला ५-० ने पराभूत केलं. लव्हलिनाविरोधात खेळताना बुसेनाझ सुर्मेनेली फारच आक्रामक पद्धतीने खेळल्याने लव्हलिना पराभूत झाली. एकीकडे लव्हलिना पहिल्यांदाच बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक आणले या आशेने सर्व भारतीय या सामन्याकडे नजर लावून बसलेले असतानाच दुसरीकडे लव्हलिनाच्या वडिलांनी मात्र हा सामना लाइव्ह पाहिला नाही.

नक्की पाहा हे फोटो >> वडिलांनी मिठाई गुंडाळून आणलेल्या पेपरने तिचं आयुष्य बदललं; लव्हलिनाचा प्रेरणादायी प्रवास

आसामच्या लव्हलिनाने उपांत्यपूर्व फेरीत चायनीज तैपईच्या नीन-शेन चेनला ४-१ अशी धूळ चारून पदक पक्के केले. मात्र उपांत्य फेरीत तिला फारशी चमक दाखवता आली नाही. तरी उपांत्यपूर्व फेरीतील मुलाची कामगिरी पाहून तिच्या वडीलांना मुलगी सुवर्णपदक जिंकेल अशी अपेक्षा होती. मात्र असं असलं तरी त्यांनी लव्हलिनाचा उपांत्य फेरीतील सामना लाइव्ह पाहिला नाही. मणिपूरमध्ये राहणाऱ्या टीकेन यांनी लव्हलिनाचा सामना लाइव्ह पाहिला नाही. अनेक भारतीय हा ऐतिहासिक सामना पाहण्यासाठी सकाळपासूनच उत्सुक होते. मात्र टिकेन यांनी हा सामना पाहणार नसल्याचं आधीच जाहीर केलं होतं. इतकच काय त्यांनी आपल्या घरातील डीटीएचसुद्धा रिचार्ज केलं नव्हतं. “मी खूप आनंदी आहे. ती तिचं स्वप्न साकार करणार आहे. तिला आयुष्यामध्ये हेच करायचं होतं. आसाममधील लोकांकडून मिळत असणाऱ्या पाठिंब्यासाठी मी त्यांचा आभारी आहे,” असं टिकेन यांनी सामना सुरु होण्यापूर्वी म्हटलं होतं.

नक्की वाचा >> Tokyo Olympics 2020 Women’s Hockey: कधी, कुठे आणि कसा पाहता येणार भारत विरुद्ध अर्जेंटिना सामना?

रेकॉर्ड बूकमध्ये लव्हलिना…

लव्हलिनाने कांस्यपदकावर आपलं नाव कोरताना काही खास विक्रम केलेत. बॉक्सिंगमध्ये पदक पटकावणारी ती दुसरी भारतीय महिला ठरली आहे. तर ईशान्य भारतामधील राज्यांमधून आलेली आणि ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावणारी ती तिसरी महिला आहे. तसेच बॉक्सिंगमध्ये पदक पटकावणारी ती तिसरी भारतीय खेळाडू ठरलीय. विजेंदर सिंग आणि एम. सी. मेरी कोम यांच्यानंतर पदक जिंकणारी लव्हलिना ही तिसरी भारतीय बॉक्सिंगपटू ठरलीय. २०१९ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत बुसेनाझने सुवर्ण मिळवले होते, तर लव्हलिना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. यंदाही लव्हलिनाला कांस्यपदकावरच समाधान मानावे लागले आहे.

नक्की पाहा हे फोटो >> भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकांचं एका महिन्याचं मानधन पाहून चक्रावून जाल

नक्की वाचा >> ऑलिम्पिक भालाफेक स्पर्धा : पहिल्याच प्रयत्नात नीरज चोप्राची अंतिम फेरीत धडक; पदकाच्या अपेक्षा वाढल्या

सर्व आमदारांनी पाहिला सामना…

लव्हलिनाचा सामना पाहण्यासाठी आसामच्या विधानसभेचं कामकाज २० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं होतं. सामना सुरु होण्याआधीच यासंदर्भातील माहिती आसाम सरकारमधील मंत्री पिजुष हजारिका यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली होती. विधानसभेचं कामकाज २० मिनिटांसाठी तहकूब करुन सर्व आमदार सामना पाहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. “आसामच्या विधानसभेचं कामकाज २० मिनिटांसाठी तहकूब करण्यात येईल. सभागृहातील सर्व आमदार भारताची लव्हलिना बोर्गोहाइन आणि तर्कीच्या बुसेनाझ सुर्मेनेलीदरम्यानचा महिला बॉक्सिंग स्पर्धेतील उपांत्य फेरीचा सामना पाहणार आहेत,” असं हजारिका म्हणाले होते.