Yesterday IPL Match Result 2026: LSG vs DC Match Highlights & Full Scorecard 1 April 2026 Ekana Cricket Stadium: आयपीएल २०२६ स्पर्धेत आतापर्यंत अनेक रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. पण बुधवारी झालेल्या सामन्यात एकतर्फी लढत पाहायला मिळाली. स्पर्धेतील पाचवा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने दमदार कामगिरी करून ६ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात धावांचा पाठलाग करत असताना इम्पॅक्ट प्लेअर म्हणून फलंदाजीला आलेला समीर रिझवी या सामन्याचा हिरो ठरला. समीरने दमदार अर्धशतकी खेळी केली.
What This Result Means for IPL 2026
दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन्ही संघांमध्ये झालेला सामना हा लखनौच्या होम ग्राऊंडवर पार पडला. अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघाने लखनौलाग त्यांच्या होम ग्राऊंडवर जाऊन पराभूत केलं आहे. त्यामुळे नक्कीच संघाचा आत्मविश्वास उंचावणार आहे.
लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यात कोणत्या संघाने बाजी मारली? (Who won yesterday match)
काल झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स (delhi capitals)संघाने बाजी मारली.
लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स सामन्याचा सामनावीर कोण ठरला? (Who was the Player of the Match in LSG vs DC match?)
या सामन्यात दमदार अर्धशतकी खेळी करणारा समीर रिझवी सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
कालच्या सामन्याचा अंतिम निकाल काय होता? What was the final score of yesterday’s match?
या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना लखनौने १४१ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना दिल्लीने ६ गडी राखून विजय मिळवला.
कालच्या सामन्यात सर्वाधिक धावसंख्या करणारा खेळाडू कोण होता? (Top Scorer of yesterday’s IPL match LSG vs DC Match?)
या सामन्यात समीर रिझवी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.
आजचा आयपीएल सामना ( Today’s IPL Match)
आज होणाऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत.
