Mohsin Khan has suffered an injury: आयपीएलच्या १६व्या पर्वाला सुरुवात होण्यासाठी आता फक्त ७ दिवस उरले आहेत. दरम्यान, लखनऊ सुपर जायंट्सच्या संघाला मोठा झटका बसला आहे. या हंगामात संघाचा स्टार गोलंदाज मोहसिन खानचे खेळणे संशयास्पद आहे. तो अद्याप दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नसला, तरी तो त्याच्या संघासोबत निश्चितपणे सराव करत आहे.

क्रिकबझमधील एका अहवालात म्हटले आहे की मोहसिन सध्या एलएसजीमध्ये प्रशिक्षण घेत आहे, परंतु त्याच्या फिटनेसवर अद्याप शंका आहे. या गोलंदाजाने गेल्या मोसमातच लखनऊ सुपर जायंट्सकडून पदार्पण केले होते. आयपीएल पदार्पणातच या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने शानदार गोलंदाजी करत सर्वांची मने जिंकली होती.

Kapil Dev Says Some people will suffer but no one is bigger than the country
Kapil Dev : “काही लोकांना त्रास होईल, परंतु देशापेक्षा कोणीही…”, कपिल देव यांनी बीसीसीआयच्या ‘त्या’ निर्णयाचे केले स्वागत
Australia vs New Zealand 1st Match Updates in Marathi
NZ vs AUS : ग्रीन-हेझलवूडची शेवटच्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी, कॅमेरूनच्या शतकाने सावरला ऑस्ट्रेलियाचा डाव
kl rahul still not fit likely to miss 5th Test against england in dharamsala
केएल राहुल अजूनही जायबंदीच;अखेरच्या कसोटी सामन्यातही खेळण्याची शक्यता कमीच
Sarfaraz Khan's Cricket Journey
Sarfaraz Khan : ‘…तर रेल्वेमध्ये कपडे विकायला जाऊ शकतो’, सर्फराझच्या वडिलांना आठवला ‘तो’ भावनिक प्रसंग

गेल्या मोसमात १४ विकेट घेतल्या होत्या –

मोहसीन खान, डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. त्याने गेल्या मोसमात एलएसजीसाठी ९ सामन्यात १४ बळी घेतले होते. तो संघाचा दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज होता. तथापि, तो आयपीएल २०२२ नंतर दुखापतग्रस्त झाला होता आणि गेल्या एका वर्षात त्याने कोणत्याही स्तरावर एकही सामना खेळलेला नाही.

आयपीएलपूर्वी हे भारतीय खेळाडू जखमी झाले होते –

आयपीएल २०२३ सुरू होण्याआधी, भारतीय स्टार खेळाडू दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर पडले आहेत. यामध्ये अपघातामुळे ऋषभ पंतही आयपीएल खेळू शकणार नाही. बुमराह आणि श्रेयस अय्यर जखमी झाले आहेत. तर राजस्थान रॉयल्सचा प्रसिद्ध कृष्णाही दुखापतीमुळे बाहेर पडला आहे.

हेही वाचा – IPL 2023: डेव्हिड वॉर्नरने दिल्ली कॅपिटल्स कॅम्पमध्ये पुष्पा स्टाईलने मारली एंट्री, पाहा मजेदार VIDEO

लखनौ सुपर जायंट्स स्क्वॉड (एलएसजी स्क्वॉड) –

आवेश खान, आयुष बडोनी, दीपक हुडा, के. गौतम, करण शर्मा, केएल राहुल, कृणाल पंड्या, काइल मेयर, मनन वोहरा, मार्कस स्टोइनिस, मार्क वुड, मयंक यादव, मोहसिन खान, क्विंटन डी कॉक, रवी बिश्नोई, निकोलस पूरन, जयदेव उनाडकट, यश ठाकूर, रोमॅरियो शेफर्ड, डॅनियल सॅम्स, अमित मिश्रा, प्रेरक मांकड, स्वप्नील सिंग, नवीन उल हक, युधवीर चरक.