MAH vs ASM Updates: भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-२० मालिकेतील दुसरा सामना गुरुवारी पुण्यात होणार आहे. या सामन्यापूर्वी आसाम आणि महाराष्ट्र संघांत एमसीए स्टेडियमवर सामना खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियातून बाहेर असलेल्या अष्टपैलू केदार जाधवने शानदार द्विशतक झळकावले आहे. केदारने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आसामविरुद्ध २८३ चेंडूत शानदार २८३ धावा केल्या.

भारतीय संघाचा फलंदाज केदार जाधव बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. त्याने २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला होता. पण जाधवने रणजी ट्रॉफी २०२२-२३ मध्ये आसामविरुद्ध द्विशतक झळकावून स्वत:ला सिद्ध केले आहे. केदार जाधवने रणजी ट्रॉफीमध्ये आपल्या कामगिरीने छाप पाडली आहे. महाराष्ट्राकडून फलंदाजी करता जाधवने २८३ चेंडूत २१ चौकार आणि १२ षटकारांच्या मदतीने २८३ धावा केल्या.

Tilak Second player to hit 50 sixes in IPL at 21
PBKS vs MI : तिलक वर्माचा IPL मध्ये मोठा पराक्रम, ऋषभ पंतनंतर ‘ही’ कामगिरी करणारा ठरला दुसरा खेळाडू
Rohit first Indian to hit 500 sixes
MI vs CSK : रोहित शर्माने रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला जमलं नाही ते करून दाखवलं
Abhishek Sharma Breaks Chris Gayle and Sunil Narine's Record in SRH vs CSK Match
SRH vs CSK : अभिषेकने वादळी खेळीच्या जोरावर मोडला गेल-नरेनचा विक्रम, IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
riyan parag
वेदनाशामक औषधे घेऊन रियान परागची निर्णायक खेळी!

एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली केदार जाधवला टीम इंडियामध्ये अनेक संधी दिल्या जात होत्या. केदार त्या विश्वासावर उभा राहून संघाला बळी मिळवून देत असे. पण विराटच्या नेतृत्वाखाली केदारला तितकी संधी मिळाली नाही. त्यामुळे केदार जाधव टीम इंडियाच्या बाहेर आहे. अशा प्रकारे दुर्लक्ष झाल्यामुळे तो निवृत्तीच्या उंबरठ्यावर उभा आहे.

सामन्याबद्दल बोलायचे, तर महाराष्ट्र संघाने प्रथम फलंदाजी करताना, १४७ षटकांत ९ बाद ५९४ धावांवर डाव घोषित केला आहे. महाराष्ट्राकडून सिद्धेश वीरने देखील शतक झळकावले. त्याचबरोबर आसाम संघाकडून गोलंदाजी करताना रियान परागने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तसेच मुख्तार हुसेनने २ आणि रणजित माळीने १ विकेट घेतली.

हेही वाचा – BPL Updates: बीसीबीवर सडकून टीका करताना शाकिब अल हसनने दिला नायक चित्रपटाचा दाखला; म्हणाला, ‘मला जर…’

केदारने २०१४ मध्ये श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियासाठी वनडे पदार्पण केले. आतापर्यंत ७३ सामने खेळले असून, ४२.०९च्या सरासरीने १३८९ धावा केल्या आहेत. त्यात २ शतके आणि ६ अर्धशतकांचा समावेश आहे. दुसरीकडे, त्याने २०१५ साली झिम्बाब्वे विरुद्ध टी-20 मध्ये पदार्पण केले होते, परंतु जाधवला आतापर्यंत फक्त ९ सामने खेळू शकला आहे. ज्यामध्ये त्याने २०.३३च्या सरासरीने केवळ १२२ धावा केल्या आहेत. केदार जाधवच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे, तर वनडेमध्ये गोलंदाजी करताना ७२ सामन्यांमध्ये ५.१५च्या इकॉनॉमीसह २७ विकेट घेतल्या आहेत.