घरच्या मैदानावरील दोन्ही सामने जिंकून मुंबई डेव्हिल्स महाकबड्डी लीगचा झोकात प्रारंभ करील, असा विश्वास कर्णधार रक्षा नारकरने व्यक्त केला. मुंबई डेव्हिल्स महिला संघाचे भारतीय क्रीडा मंदिराच्या संकुलात अनुक्रमे ठाणे टायगर्स आणि नगर चॅलेंजर्स यांच्याविरुद्ध सामने होणार आहेत.
‘‘सायली केरीपाळे, सोनाली शिंगटे, रक्षा नारकर आणि पौर्णिमा जेधे यांच्यावर आमची प्रमुख मदार आहे. आमचा पहिला सामना ठाण्याविरुद्ध आहे. स्नेहल शिंदे, राजश्री पवार, निकीता कदम आणि सोनाली इंगळे यांच्यासारखे दिग्गज खेळाडू ठाण्याच्या संघात आहेत. परंतु तरीही आम्हाला विजयी सलामी नोंदवणे जड जाणार नाही,’’ असा विश्वास मुंबई डेव्हिल्सचे प्रशिक्षक राजेश पाडावे यांनी व्यक्त केला.
मुंबई डेव्हिल्स
महिला संघ : रक्षा नारकर (कर्णधार), सायली केरीपाळे, श्वेता राणे, सोनाली धुमाळ, अर्चना करडे, स्नेहा बिबवे, ऋ तुजा देऊलकर, सोनाली शिंगटे, पौर्णिमा जेधे, मंगल माने; प्रशिक्षक : राजेश पाडावे, व्यवस्थापक : सपना पाटील.
पुरुष संघ : देवेंद्र कदम (कर्णधार), नवनाथ जाधव, विशाल कदम, उमेश म्हात्रे, संकेत सावंत, अजिंक्य कापरे, गणेश ठेरंगे, नितीन मोरे, शैलेश गाराळे, सुदेश कुळये; प्रशिक्षक : सुधीर देशमुख