आरसीएफ क्रीडा संकुल येथे चालू असलेल्या महाकबड्डी लीग स्पध्रेच्या तिसऱ्या टप्प्याला गुरुवारी झोकात सुरुवात झाली. महिलांच्या ‘ब’ गटात अत्यंत अटितटीच्या सामन्यात रत्नागिरी रायडर्स संघाने बारामती हरिकेनचा ४१-४० असा अवघ्या एका गुण फरकाने पराभव केला. रत्नागिरीने स्पध्रेतील सलग तिसरा विजय मिळवून गटातील अव्वल स्थानासह बाद फेरीत शानदार प्रवेश केला. मध्यंतराला रत्नागिरी रायडर्स संघ १७-१९ असा पिछाडीवर होता. मात्र ईश्वरी कोंढाळकर, आश्विनी शेवाळे आणि अपेक्षा टाकळे यांनी अपेक्षाप्रमाणे खेळ केल्यामुळे पिछाडी भरून काढून हा विजय मिळवता आला.
बारामती संघाने मध्यंतरानंतर लगेचच रत्नागिरी संघावर पहिला लोण लावला. दोन्ही तुल्यबळ संघ असल्याने प्रत्येक मिनिटागणिक हा सामना दोलायमान होत होता. अशातच रत्नागिरीच्या संघाने अत्यंत शिस्तबद्ध खेळ करीत मध्यंतरानंतर सहाव्या मिनिटाला बारामती संघावर लोण करीत आघाडी घेतली. यामध्ये ईश्वरीने केलेला सुपर पाठलाग आणि मोक्याच्या वेळी बारामतीची आघाडीची चढाईपटू नेहा घाडगे व स्नेहल िशदे यांच्या केलेल्या पकडी यांमुळे हा सामना रत्नागिरीला जिंकता आला. रत्नागिरीच्या ईश्वरीने चढाईच्या ६ गुणांसह ६ पकडी घेत १२ गुण कमवले. आश्विनी शेवाळेने ७ गुण व अपेश्रा टाकळेने ८ गुण मिळवून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. बारामतीच्या स्न्ोहल िशदेने चढायांचे ११ (२ बोनस) मिळवले. तर नेहा घाटगेने ७ गुण (५ बोनस) मिळवत जोरदार लढत दिली, मात्र त्या आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकल्या नाहीत.