ठाणे टायगर्सची विजयी डरकाळी

कर्णधार स्नेहल शिंदेच्या आक्रमक खेळाच्या बळावर ठाणे टायगर्स संघाने महाकबड्डी लीग स्पध्रेच्या दुसऱ्या टप्प्यात अटीतटीच्या सामन्यात रायगड डायनामोज संघाचा ३९-३३ असा पराभव करून दुसऱ्या विजयाची नोंद केली. पुरुष विभागात पुणे पँथर्स संघाने रत्नागिरी रायडर्स संघावर ३८-२६ अशी मात केली.

कर्णधार स्नेहल शिंदेच्या आक्रमक खेळाच्या बळावर ठाणे टायगर्स संघाने महाकबड्डी लीग स्पध्रेच्या दुसऱ्या टप्प्यात अटीतटीच्या सामन्यात रायगड डायनामोज संघाचा ३९-३३ असा पराभव करून दुसऱ्या विजयाची नोंद केली. पुरुष विभागात पुणे पँथर्स संघाने रत्नागिरी रायडर्स संघावर ३८-२६ अशी मात केली.

खेड येथील महाड नाका गोळीबार मदानावर झालेल्या महिला विभागाच्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात स्नेहलने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करीत आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. ठाणे टायगर्सने अवघ्या चौथ्या मिनिटाला पहिला व मध्यंतराला नंतर पाचव्या मिनिटाला दुसरा लोण चढवत आघाडी घेतली. मध्यंतराला ठाणे टायगर्सकडे २०-१६ अशी आघाडी होती. स्नेहलने १७ गुण २ बोनस व एक पकड गेली. आम्रपाली गलांडेने आपल्या खोलवर चढायांच्या जोरावर ११ गुण मिळविले. त्यांना सोनाली इंगळेने ५ व अंकिता मोहोळने ४ पकडी घेत चांगली साथ दिली. रायगडच्या अभिलाषा म्हात्रेने एकाकी लढत दिली. तिने ११ गुणांसह ६ बोनस व १ पकड घेत १८ गुण वसूल केले. डायनोमोजच्या भार्गवी मानेने ३ बोनस गुणांसह १ गुण मिळविला. गौरी वाडेकरला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. चढाई सुरू असताना बोलल्याबद्दल सामना अधिकारी दत्ता िझजुर्डे यांनी ठाण्याच्या मार्गदर्शकाला हिरवे कार्ड दाखवून ताकीद दिली.
 पुणे पँथसने रत्नागिरी रायडर्सवर ३८-२६ अशी मात केली. दोन सामने गमावल्यामुळे स्पर्धेतले आव्हान टिकवण्यासाठी पुण्याला या विजयानंतरही गणितीय समीकरणांवर अवलंबून राहवे लागणार आहे. मध्यंतराला पुण्याकडे १९-१५ अशी आघाडी होती. रत्नागिरीच्या स्वप्निल शिंदेने १० पकडी आणि तीन सुपर पकडी करत संघाची गुणसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. पुण्यातर्फे शुभम कुंभारने दुखापतग्रस्त झाल्यानंतरही ११ गुण मिळवले. विराज लांडगे आणि सुहास वागीरे यांनी त्याला चांगली साथ दिली. गैरवर्तन केल्यामुळे पंचांनी शुभमला हिरवे कार्ड दाखवले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Maha kabaddi league thane tigers