अशोक मनेरिया याने शानदार शतक झळकावत राजस्थानला महाराष्ट्राविरुद्धचा रणजी क्रिकेट सामना अनिर्णीत ठेवण्यात यश मिळवून दिले. महाराष्ट्राने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर तीन गुण वसूल केले.
मनेरियाने नाबाद दीडशतकी खेळीसह रजत भाटिया व दिशांत याज्ञिक यांच्या समवेत शतकी भागीदारी रचताना महाराष्ट्राला निर्णायक विजयापासून दूर ठेवले. त्यामुळेच राजस्थानला दुसऱ्या डावात ५ बाद ३३४ अशी धावसंख्या रचता आली. शेवटच्या सत्रात २४३ धावांचे आव्हान मिळालेल्या महाराष्ट्राने दुसऱ्या डावात बिनबाद १९ धावा केल्या. मनेरिया याने १२ चौकार व दोन षटकारांसह नाबाद १५० धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक-राजस्थान पहिला डाव ३१८ व ५ बाद ३३४ घोषित (अशोक मनेरिया नाबाद १५०, रजत भाटिया ६४, दिशांत याज्ञिक नाबाद ५८, श्रीकांत मुंडे २/५१)
महाराष्ट्र ४०९ व बिनबाद १९