scorecardresearch

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा : किरण भगत पहिल्याच फेरीत वेताळ शेळकेकडून चीतपट

गोंदियाच्या वेताळ शेळकेने उपमहाराष्ट्र केसरी भगतला ४-३ असे चीतपट केले.

वाई : साताऱ्याचा मल्ल किरण भगतचे महाराष्ट्र केसरी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत बुधवारी पहिल्याच फेरीत आव्हान संपुष्टात आले. गोंदियाच्या वेताळ शेळकेने उपमहाराष्ट्र केसरी भगतला ४-३ असे चीतपट केले. त्यामुळे यजमानांच्या महाराष्ट्र केसरीच्या आशा मावळल्या. सोलापूरचा सौरभ इगवे, बीडचा अतिष तोडकर यांनी चमकदार कामगिरी करीत अंतिम फेरी गाठली. गादीवरील ७० किलो वजन गटात कोल्हापूरचा शुभम पाटील, सोनबा गोंगणे, सिंधुदुर्गचा कल्पेश तळेकर, जालन्याचा हर्षद शेख यांनी विजय मिळवले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtra kesri pailwan kiran bhagat lost in first round by vedal shelke zws