scorecardresearch

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा: नेमबाजीत तेजस्विनी सावंत, पुष्कराज इंगोलेला सुवर्ण

Maharashtra State Olympic Competition: कोल्हापूरची ऑलिम्पिकपटू तेजस्विनी सावंत आणि रत्नागिरीच्या पुष्कराज इंगोले यांनी मंगळवारी महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धेच्या नेमबाजी क्रीडा प्रकारात ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात सुवर्णपदक मिळवले.

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा: नेमबाजीत तेजस्विनी सावंत, पुष्कराज इंगोलेला सुवर्ण
तेजस्विनी सावंत

Maharashtra State Olympic Competition:कोल्हापूरची ऑलिम्पिकपटू तेजस्विनी सावंत आणि रत्नागिरीच्या पुष्कराज इंगोले यांनी मंगळवारी महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धेच्या नेमबाजी क्रीडा प्रकारात ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात सुवर्णपदक मिळवले.माजी विश्वविजेत्या तेजस्विनी सावंतने ५० मीटर रायफल प्रोनमध्ये महिलांच्या गटात ६१८ गुणांसह अग्रस्थान पटकावले. मुंबईच्या भक्ती खामकरचा तेजस्विनीने ४.५ गुणांच्या फरकाने पराभव केला. पुण्याची प्रणाली सूर्यवंशी (६११.७) कांस्यपदकाची मानकरी ठरली.

हेही वाचा >>>Suryakumar Yadav: ‘लहानपणी फलंदाजी करताना पाहिले नसेल’, सूर्यासोबत फनी मूडमध्ये दिसला द्रविड, पाहा VIDEO

पुरूषांच्या ५० मीटर प्रोन स्पर्धेत इंगोलेने एकूण ६२१.७ गुणांसह सुवर्णपदक जिंकले. कोल्हापूरच्या इंद्रजित मोहितने एकूण ६१८ गुणांसह रौप्यपदक, तर पुण्याच्या अभिजित सिंहने एकूण ६१२.९ गुणांसह कांस्यपदक पटकावले.मुंबई शहर-पुणे अंतिम झुंज मुंबई शहरने बलाढय़ ठाण्याला २-१ ने पराभूत करून बॅडिमटन महिला सांघिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. सुवर्णपदकाच्या लढतीत त्यांची गाठ दुसऱ्या मानांकित पुण्याशी पडेल. पुण्याने नागपूरचा २-१ अशाच फरकाने पराभव केला.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-01-2023 at 02:27 IST

संबंधित बातम्या