महेंद्रसिंह धोनी ‘सूर्यवंशी’ चित्रपटात दिसणार? गुलशन ग्रोवर म्हणाले…

महेंद्र सिंह धोनी जगातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेटर आहेत

ms dhoni
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका फोटोमुळे प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे

महेंद्रसिंह धोनी जगातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेटर आहे. त्याचे अनेक आणि फॉलोअर्स आहेत. तो सोशल मीडिया जास्त वापरत नसला तरी लोक त्याच्याबाबत अनेक गोष्टी शेअर करत असतात. त्याची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. दरम्यान सोशल मीडियावर धोनी बॉलीबूडमध्ये मोठ्या पडद्यावर येणार असल्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका फोटोमुळे प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का बसला असून याचे कारण आहे बॉलिवूडचा खलनायक गुलशन ग्रोवर. 

गुलशन ग्रोवर यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून धोनीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे आणि असे काहीतरी लिहिले आहे, ज्यामुळे चाहत्यांना धोनीची चित्रपटात पदार्पण होण्याची शंका आहे. याबाबत चर्चा देखील सुरु झाली आहे. हा फोटो पाहून धोनी रोहित शेट्टीच्या बहुप्रतिक्षित ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात अक्षय कुमार आणि कतरिना कैफसोबत स्क्रिन शेअर करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र याबाबत अधीकृत माहिती नसून फक्त एका फोटो आणि त्यासोबत लिहिलेल्या कॅप्शनमुळे धोनी बॉलिवूडमध्ये एंट्री करणार असल्याच्या चर्चेला उधाण आल आहे.

गुलशन ग्रोवरचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि चाहते त्यावर जोरदार कमेंट करत आहेत.
खरं तर, धोनी आणि गुलशन ग्रोवरचा हा फोटो ‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या सेटवरचा असल्याचे सांगण्यात येत आहे. गुलशन ग्रोवरनेही फोटोला असे कॅप्शन दिले आहे, ज्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. त्याने लिहिले, “भाऊ धोनीसोबत सूर्यवंशीच्या सेटवर काय? एमएस धोनी चित्रपटात काम करतोय की त्याच स्टुडिओत चित्रीकरण करतोय?”, या ट्विटवर चाहते धोनीच्या चित्रपटांमध्ये काम करण्याबाबतही मत व्यक्त करत आहेत.

महेंद्रसिंह धोनी सध्या संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरू असलेल्या आयसीसी टी -२० विश्वचषक २०२१ मध्ये टीम इंडियाचा मेंटर म्हणून काम करत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mahendra singh dhoni entry in akshay kumar film suryavanshi gulshan grover remarkable statement srk