VIDEO : “माझा शेवटचा टी -२० सामना…”; महेंद्रसिंह धोनीने सांगितली मन की बात

महेंद्रसिंह धोनीने त्याच्या खेळाबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

Mahendra Singh Dhoni spoke his mind About his last t -20 match
photo (@ChennaiIPL)

आयपीएल २०२१ चे विजेतेपद जिंकणारा चेन्नई सुपर किंग्स (CSK) कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या भविष्याबाबत अद्याप काहीही ठरलेले नाही. धोनी किती दिवस आयपीएलमध्ये खेळणार याबाबत कोणालाच माहिती नाही. मात्र, आता धोनीने त्याच्या खेळाबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

महेंद्रसिंह धोनीने आपला शेवटचा टी-२० सामना चेन्नईत होणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे हा अनुभवी खेळाडू पुढील मोसमातही चेन्नईकडून खेळताना दिसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘‘चेन्नईच्या चाहत्यांनी नेहमीच आम्हाला भरभरून पाठिंबा दिला आहे. कारकीर्दीतील घरच्या मैदानावरील अखेरचा एकदिवसीय सामना मी रांची येथे खेळलो. त्यामुळे आता अखेरचा ट्वेन्टी-२० सामना चेन्नईच्या जर्सीत चेपॉकवर खेळायला आवडेल. परंतु तो वर्षी होईल किंवा सामना पुढील पाच वर्षांत कधीही येऊ शकतो,’’ असेही महेंद्रसिंह धोनी म्हणाला.

पुढील ‘आयपीएल’ भारतात

‘आयपीएल’चा १५वा हंगाम भारतात खेळवण्यात येईल, जय शहा यांनी सांगितले. ‘‘आयपीएलच्या १५व्या हंगामाची लिलावप्रक्रिया लवकरच होईल. परंतु पुढील वर्षी ही स्पर्धा नक्कीच भारतात होईल. त्यामुळे चेन्नईचे चाहते धोनीला खेळताना पाहू शकतील,’’ असे शहा म्हणाले.

“प्रिय महेंद्रसिंह धोनी तू…”; तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचा CSKच्या कर्णधाराला खास संदेश

मुख्यमंत्री स्टॅलिन धोनीचे चाहते

मुख्यमंत्री एमके स्टॅलिन म्हणाले, “मी येथे तामिळनाडूचा मुख्यमंत्री म्हणून नाही तर धोनीचा चाहता म्हणून आलो आहे. केवळ मीच नाही तर येथे उपस्थित असलेली माझी नातवंडेही त्याचे चाहते आहेत. माझ्या दिवंगत वडिलही धोनीचे चाहते होते. मी धोनीला आवाहन करतो की, आता निवृत्तीचा विचार करू नका कारण आम्हाला त्याला पुढील अनेक वर्षे चेन्नईच्या कर्णधारपदी पहायचे आहे.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mahendra singh dhoni spoke his mind about his last t 20 match srk

Next Story
विजयी भव !
ताज्या बातम्या