scorecardresearch

Premium

MLC 2023: मुबंई इंडियन्सने किरॉन पोलार्डच्या खांद्यावर सोपवली नवी जबाबदारी, एमआय न्यूयॉर्कसाठी ‘ही’ भूमिका निभावणारा

Major League Cricket 2023: एमआय न्यूयॉर्कने १३ जुलैपासून अमेरिकेत सुरू होणाऱ्या मेजर लीग क्रिकेटच्या पहिल्या हंगामासाठी आपल्या संघाची घोषणा केली आहे. त्याचबरोबर फ्रँचायझीने कर्णधार आणि सपोर्ट स्टाफची घोषणा केली.

Major League Cricket 2023 Updates
किरॉन पोलार्ड (फोटो-संग्रहित छायाचित्र लोकसत्ता)

Kieron Pollard Appointed MI New York Captain: अमेरिकेत १३ जुलैपासून मेजर लीग क्रिकेटच्या पहिल्या हंगामाल सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी एमआय न्यूयॉर्क फ्रँचायझीने आपल्या संघाबद्दल दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या आहे. ज्यामध्ये संघातील खेळाडू आणि संघाच्या कर्णधाराचे नाव जाहीर करण्यात आले आहे. वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार आणि सध्याचे मुंबई इंडियन्सचा फलंदाजी प्रशिक्षक किरॉन पोलार्डला एमआय न्यूयॉर्क संघाचा कर्णधार नियुक्त केले आहे.

खरं तर, बुधवारी, एमएलसी २०२३ या हंगामासाठी, एमआय न्यूयॉर्क फ्रँचायझीने आपल्या परदेशी खेळाडूंची नावे जाहीर केली, जे या हंगामात खेळताना दिसणार आहेत. यासह, फ्रँचायझीने किरॉन पोलार्डला आपल्या संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. मुंबई इंडियन्सच्या कुटुंबासोबत पोलार्डची ही एक नवीन इनिंग असेल.

India vs Australia Cricket Score Updates in Marathi
IND vs AUS, World Cup 2023: मिचेल स्टार्कने किशनला बाद करत मोडला मलिंगाचा विक्रम, विश्वचषकात केला खास पराक्रम
disney hotstar and Gautam Adani
डिस्ने हॉटस्टार गौतम अदाणींकडे जाण्याची शक्यता, नेमकं प्रकरण काय?
west indies decline
World Cup Cricket: वेस्ट इंडिजच्या गतवैभवाच्या राहिल्या फक्त आठवणी…
IND vs AUS: Team India arrives in Rajkot for 3rd ODI Rohit Brigade ready to whitewash Australia watch Video
IND vs AUS: तिसर्‍या वन डेसाठी टीम इंडिया पोहोचली राजकोटला; ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश देण्यासाठी रोहित ब्रिगेड सज्ज, पाहा Video

पोलार्डशिवाय हे परदेशी खेळाडू संघात असतील –

पोलार्डशिवाय एमआय न्यूयॉर्कमध्ये आणखी ८ परदेशी खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. त्यात ट्रेंट बोल्ट, टीम डेव्हिड, डेवाल्ड ब्रेविस, निकोलस पूरन, राशिद खान, डेव्हिड विज, कगिसो रबाडा आणि जेसन बेहरेनडॉर्फ यांच्या नावांचा समावेश आहे. यातील बहुतेक खेळाडू याआधी मुंबई इंडियन्सकडून खेळले आहेत. पोलार्डने गेल्या वर्षीच आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली होती, त्यानंतर त्याला मुंबई इंडियन्सने त्याच्याच संघाचा फलंदाजी प्रशिक्षक बनवले होते. तर राशिद खान दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० लीगमध्ये एमआय केपटाऊनकडून खेळतो आणि संघाचा कर्णधारही आहे.

हेही वाचा – TNPL 2023: रविचंद्रन अश्विनने रिव्ह्यूवर रिव्ह्यू घेण्याचा का घेतला निर्णय? सामन्यानंतर केला खुलासा, पाहा VIDEO

आयपीएलमधील किरॉन पोलार्डची आकडेवारी –

मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू किरॉन पोलार्डने आयपीएलमध्ये फ्रँचायझीसाठी १८९ सामने खेळले असून, त्याने २८.६७ च्या सरासरीने ३४१२ धावा केल्या आहेत. याशिवाय पोलार्डने ८.७९ च्या इकॉनॉमीसह ६९ विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये मुंबईसाठी सर्वाधिक धावा करणारा किरॉन पोलार्ड दुसरा खेळाडू आहे. पोलार्ड हा मुंबईसाठी सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू आहे. याशिवाय, मुंबई इंडियन्ससाठी त्याचा स्ट्राइक रेट १४७.३२ चा राहिला आहे, जो फ्रेंचायझीसाठी दुसरा सर्वोच्च आहे.

मेजर लीग क्रिकेट २०२३ चे वेळापत्रक –

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणारा किरॉन पोलार्ड आता मेजर लीग क्रिकेटमध्ये चमक दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. मेजर लीग क्रिकेट १३ जुलैपासून सुरू होत आहे, जे ३० जुलैपर्यंत चालेल. या स्पर्धेचे सामने अमेरिकेतील डॅलस राज्यातील ग्रँड प्रेरी स्टेडियमवर आणि दुसऱ्या क्रमांकावर मूर्सविले येथील चेरास स्ट्रीट पार्क येथे खेळवले जातील. लीगच्या पहिल्या आवृत्तीत एकूण 6 संघ सहभागी होत असून सर्व संघांमध्ये प्लेऑफसह एकूण १६ सामने खेळवले जाणार आहेत.

हेही वाचा – Arjun Tendulkar: सचिनच्या मुलाला BCCIचे खास आमंत्रण! तीन आठवड्यांच्या स्पेशल ट्रेनिंगनंतर अर्जुन करणार टीम इंडियात प्रवेश?

याशिवाय, स्पर्धेचा पहिला टप्पा म्हणजेच पहिले सहा दिवस सर्व सामने ग्रँड प्रेरी स्टेडियमवर खेळवले जातील. त्यानंतर स्पर्धेचा दुसरा टप्पा मूर्सविले येथील चेर्स स्ट्रीट पार्क येथे खेळवला जाईल. त्यामुळे त्यानंतर प्लेऑफ आणि फायनलसह सर्व सामने ग्रँड प्रेरी स्टेडियमवरच खेळवले जातील.

एमआय न्यूयॉर्कचे स्कॉड-

किरॉन पोलार्ड, रशीद खान, ट्रेंट बोल्ट, निकोलस पूरन, टिम डेव्हिड, जेसन बेहरेनडॉर्प, डेवोल्ड ब्रेविस, कागिसो रबाडा, डेव्हिड व्हीजे, स्टीव्हन टेलर, हम्माद आझम, एहसान आदिल, नस्तुश केन्झिगे, मोनांक पटेल, सरबजीत लड्डा, शायन, जहांगीर, केनजीर फिलिप, साईदीप गेमश

एमआय न्यूयॉर्कचे कोचिंग स्टाफ –

एमआय न्यूयॉर्कने दक्षिण आफ्रिकेचा माजी अनुभवी फलंदाज रॉबिन पीटरसन यांची या लीगसाठी संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. तर श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा गोलंदाजी प्रशिक्षक असेल. जे अरुणकुमार आणि जेम्स पॅमेंट हे फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक असतील.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Major league cricket 2023 kieron pollard appointed as captain of mi new york franchise vbm

First published on: 15-06-2023 at 11:36 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×