Malaysia Masters badminton : भारताला दुहेरी धक्का; सिंधू, सायना स्पर्धेबाहेर

दोघींचाही सरळ सेटमध्ये झाला पराभव

Malaysia Masters badminton : मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताला शुक्रवारी दुहेरी धक्का बसला. भारताच्या स्टार बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू आणि सायना नेहवाल या दोघींचेही आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. सायना नेहवालला कॅरोलिना मरिनने धूळ चारली तर सिंधूला ताई झू यिंग हिने मात दिली.

सायना नेहवालला कॅरोलिना मरिन हिने ८-२१, ७-२१ असे मोठ्या फरकाने पराभूत केले. सायना पहिल्याच गेमपासून अत्यंत हतबल दिसत होती. पहिला गेम ८-२१ असा गमावल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये तरी सायनाकडून प्रतिकार पाहायला मिळेल अशी चाहत्यांना अपेक्षा होती, पण सायनाला फारसा प्रहार करणे जमले नाही. मरिनने दुसरा गेम ७-२१ असा जिंकून सामना खिशात घातला.

त्यानंतर भारताला सिंधूकडून आशा होत्या. पण सिंधूने देखील भारतीय चाहत्यांची निराशा केली. सिंधूपुढे तैवानच्या ताई झू यिंग हिचे आव्हान होते. यिंगने सिंधू २१-१६, २१-१६ अशा सरळ सेटमध्ये पराभूत केले. दोनही गेममध्ये सिंधूने चांगला प्रतिकार केला. पण तिला सामना जिंकणे शक्य झाले नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Malaysia masters badminton quarter finals live pv sindhu saina nehwal knocked out in straight game vjb

Next Story
हॉकीबाबतचा फैसला ३ नोव्हेंबरला
ताज्या बातम्या