scorecardresearch

मलेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा : प्रणॉयची आगेकूच; साईप्रणीत, समीरचे आव्हान संपुष्टात

भारताच्या एचएस प्रणॉयने मंगळवारी मलेशियाच्या डॅरेन लीववर संघर्षपूर्ण विजय मिळवत मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीची दुसरी फेरी गाठली.

sp pranoy

क्वालालम्पूर : भारताच्या एचएस प्रणॉयने मंगळवारी मलेशियाच्या डॅरेन लीववर संघर्षपूर्ण विजय मिळवत मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीची दुसरी फेरी गाठली. बी साईप्रणीत आणि समीर वर्मा यांचे आव्हान मात्र संपुष्टात आले. जूनच्या पूर्वार्धात इंडोनेशिया खुल्या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणाऱ्या प्रणॉयने डॅरेनविरुद्धची लढत ६२ मिनिटांत २१-१४, १७-२१, २१-१८ अशा फरकाने जिंकली. प्रणॉयची पुढील फेरीत चायनीज तैपेईच्या चौथ्या मानांकित चोऊ टीन चेनशी गाठ पडणार आहे.

साईप्रणीतने जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावरील इंडोनेशियाच्या अ‍ॅन्थनी सिनिसुका गिनटिंगविरुद्ध १५-२१, २१-१९, ९-२१ अशी हार पत्करली. तसेच समीरने जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकावरील जोनाटन ख्रिस्टीकडून १४-२१, २१-१३, ७-२१ असा पराभव पत्करला.

महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि सिक्की रेड्डी यांचीही वाटचाल संपुष्टात आली. नामी मात्सुयामा आणि चिहारू शिदा यांनी या जोडीला २१-१५, २१-११ असे नामोहरम केले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Malaysia open badminton tournament pranoy winning opener mr vijay ysh

ताज्या बातम्या