लुसाने : बेलगे्रड येथे होणाऱ्या आगामी जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेपासून मानाचा पट्टा आणि परंपरागत लाल-निळ्या ग्लोव्हजऐवजी पांढरे ग्लोव्हज वापरण्यात येणार आहे, अशी घोषणा आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेकडून (एआयबीए) करण्यात आली आहे.

जागतिक बॉक्सिंग स्पर्धा २४ ऑक्टोबरपासून बेलग्रेड (सर्बिया) येथे सुरू होणार असून विजेत्या आणि उपविजेत्या बॉक्सिंगपटूंना अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदके दिली जातील. त्यामुळे बॉक्सिंग स्पर्धेतील विजेत्याला मानाचा पट्टा, पदक आणि रोख पारितोषिक असे तिहेरी इनाम लाभणार आहे. २६ लाख डॉलर रकमेची रोख पोरितोषिके देण्यात येणार असल्याचे ‘एआयबीए’ने आधीच जाहीर केले आहे. याशिवाय सहभागी क्रीडापटूंना क्रीडा साहित्यावर त्यांच्या राष्ट्रध्वजाचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे.