मंजुषा सहस्रबुद्धे यांनी ओल्ड माँन्क्स स्पोर्ट्स क्लब आयोजित प्रौढांच्या राज्य बॅडमिंटन स्पर्धेतील चार गटांत विजेतेपद मिळवित निर्विवाद वर्चस्व गाजविले.
मॉडर्न क्रीडा संकुलात झालेल्या या स्पर्धेत सहस्रबुद्धे यांनी ३५ वर्षे महिलांच्या एकेरीत सायली परब यांना २१-२, २१-३ असे निष्प्रभ केले. मिश्रदुहेरीत त्यांनी आनंद जोशी यांच्या साथीत विजेतेपद मिळविले. या जोडीने अंतिम फेरीत दीपक पटवर्धन व दीपाली जोशी यांचा २१-१४, २१-१९ असा पराभव केला. ४० वर्षे वयोगटात सहस्रबुद्धे यांनी एकेरीच्या अंतिम लढतीत सुवर्णा काळे यांच्यावर २१-११, २१-१४ अशी मात केली. दुहेरीत त्यांनी राजश्री भावे यांच्या साथीत विजेतेपद मिळविताना सुवर्णा काळे व संजीवनी महाजन यांना २१-१२, २१-५ असे हरविले.
अजय साळवी यांनी ४० वर्षे वयोगटात अजिंक्यपद मिळविताना केदार टांकसाळे यांना २१-१०, २१-१३ असे हरविले. मिश्रदुहेरीत त्यांनी संगीता जाधव यांच्या साथीत विजेतेपदावर मोहोर नोंदविली. या जोडीने अंतिम लढतीत दीपक पटवर्धन व दीपाली जोशी यांना १९-२१, २१-१३, २१-१८ असे हरविले.
अन्य अंतिम निकाल-पुरुष ६० वर्षे-अशोक शर्मा वि.वि. महंमद शौकत ४-२ (निवृत्त), दुहेरी-अशोक शर्मा व महंमद शौकत वि.वि. धनराम खोंडे व रमेश ठाकरे २१-७, २१-११. ५५ वर्षे-प्रवीण सकपाळ वि.वि. संजय परांडे २१-१८, २०-२२, २१-१२. ५० वर्षे-ए.सुरेश वि.वि. अवधूत जोशी २१-१६, १६-२१, २१-१५. दुहेरी-हरीश अनगोलकर व अतुल बिनीवाले वि.वि. प्रदीप बेहरानी व हयात खान २१-१९, २१-१३. ४५ वर्षे-अजय श्रीवास्तव वि.वि. पी.बी.मुखर्जी २१-१९, २१-१९.
संग्रहित लेख, दिनांक 21st Jan 2015 रोजी प्रकाशित
मंजुषा सहस्रबुद्धे यांचा विजेतेपदाचा चौकार
मंजुषा सहस्रबुद्धे यांनी ओल्ड माँन्क्स स्पोर्ट्स क्लब आयोजित प्रौढांच्या राज्य बॅडमिंटन स्पर्धेतील चार गटांत विजेतेपद मिळवित निर्विवाद वर्चस्व गाजविले.
First published on: 21-01-2015 at 12:47 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manjusha sahasrabudhe won state badminton tournament