भारत ‘अ’ संघाचे नेतृत्व तिवारीकडे

वेस्ट इंडिजविरुद्ध मुंबईत होणाऱ्या दोन सराव सामन्यांसाठी अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने सोमवारी चेन्नईत झालेल्या बैठकीनंतर भारत ‘अ’ संघाची निवड जाहीर केली.

वेस्ट इंडिजविरुद्ध मुंबईत होणाऱ्या दोन सराव सामन्यांसाठी अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने सोमवारी चेन्नईत झालेल्या बैठकीनंतर भारत ‘अ’ संघाची निवड जाहीर केली. मनोज तिवारीकडे या संघाचे नेतृत्व सोपवले असून, या संघात मुंबईचा धवल कुलकर्णी आणि महाराष्ट्राच्या केदार जाधवनचा समावेश करण्यात आला आहे. ३ ऑक्टोबरला पहिला एकदिवसीय सराव सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे, तर ५ ऑक्टोबरला दुसरा एकदिवसीय सामना वानखेडे स्टेडियमवर होणार आहे, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव संजय पटेल यांनी दिली.
भारत ‘अ’ संघ
मनोज तिवारी (कर्णधार), उन्मुक्त चंद, मुरली विजय, करुण नायर, केदार जाधव, संजू सॅमसन, स्टुअर्ट बिन्नी, परवेझ रसूल, अमित मिश्रा, जसप्रीत बुमराह, धवल कुलकर्णी, राहुल शुक्ला, करण शर्मा, गुरकिराट सिंग मान.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Manoj tiwary to lead india a squad