लुइस सुआरेझचा वादग्रस्त चावा पाहू न शकलेले रेफ्री मंगळवारी होणाऱ्या ब्राझील आणि जर्मनीच्या सामन्यात पंचगिरी करणार आहेत. मेक्सिकोचे मार्को रॉड्रिगेझ यांना बेलो हॉरिझोंटे येथे होणाऱ्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी रेफ्री म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, अशी माहिती फिफाकडून देण्यात आली आहे. रॉड्रिगेझ यांनी उरुग्वे-इटली सामन्यासह विश्वचषकातील दोन सामन्यांत आतापर्यंत पंचगिरी केली आहे. २४ जूनला उरुग्वेने इटलीला १-० असे हरवले. त्या सामन्यात सुआरेझने इटलीचा बचावपटू जॉर्जिओ चिएलिनीच्या खांद्यावर चावा घेतला. हा वादग्रस्त क्षण रेफ्री रॉड्रिगेझ यांनी पाहिला नव्हता. तसेच त्यांनी सुआरेझवर कारवाई केली नव्हती. मग फिफाने सुआरेझवर चार महिन्यांसाठी बंदी घातली आहे.