scorecardresearch

Premium

ENG vs AUS 5th Test: ऑस्ट्रेलियन संघाला डिवचणाऱ्या इंग्लडच्या चाहत्यावर मार्नस लाबुशेन संतापला, पाहा VIDEO

Marnus Labuschagne Video: मार्नस लाबुशेनचा एक व्हिडीओ सोशल मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो एका दर्शकाच्या असभ्यतेला उत्तर देताना दिसत आहे.

Video of Marnus Labuschagne lashing out at viewer
मार्नस लाबुशेन (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Marnus Labuschagne getting angry after being insulted by an England fan: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अॅशेस मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना खेळला जात आहे. लंडन येथे खेळला जात असलेला हा सामना दोन्ही संघाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या खडतर स्पर्धेच्या काळात दोन्ही देशातील क्रिकेटप्रेमींमध्येही उत्साह संचारला आहे. त्यानंतर मैदानावर अनेकवेळा क्रिकेटपटू आणि चाहत्यांमध्ये वादाचे प्रसंगही समोर येतात. लंडनच्या ओव्हल ग्राऊंडवर खेळल्या जात असलेल्या पाचव्या कसोटीदरम्यान असेच काहीसे पाहायला मिळाले. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

इंग्लडच्या चाहत्याने ऑस्ट्रेलिया संघाला डिवचले –

तिसर्‍या दिवसाचा खेळ संपल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ मैदानातून ड्रेसिंग रुमकडे परत येत असताना इंग्लंडच्या एका चाहत्याने ऑस्ट्रेलियन खेळाडूंसमोर मुद्दाम ओरडण्यास सुरुवात केली. काही ना काही बोलून त्याने खेळाडूंना चिडवायला सुरुवात केली. दरम्यान, जेव्हा उस्मान ख्वाजा आणि मार्नस लाबुशेन ड्रेसिंग परतत होते, तेव्हा इंग्लंडच्या चाहत्याने त्यांना बोरिंग म्हणून चिडवले. त्यावर मार्नस लाबुशेन चांगलाच भडकला. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

Noida Police Shares Video Of python rescue
धावत्या ट्रकच्या केबिनमध्ये शिरला भलामोठा अजगर, पोलिसांच्या सतर्कतेमुळे बचावला ड्रायव्हर, थरारक VIDEO पाहाच
passenger dancing in a train video went viral Northern Railway gave valuable advice
ट्रेनमध्ये डान्स करणाऱ्या प्रवाशाचा Video झाला व्हायरल; उत्तर रेल्वेने दिला मोलाचा सल्ला…
People looted Apple store in America
जमावाने चक्क Apple स्टोअर लुटलं, महिलेने सुरु केलं थेट प्रक्षेपण, आयफोन घेऊन पळणारे लोक कॅमेऱ्यात कैद
Pickpocketing video goes viral
भर गर्दीत बसमध्ये चढताना चोरट्याने साधला डाव, पाकिटमारीचा VIDEO होतोय व्हायरल

मार्नस लाबुशेन इंग्लडच्या चाहत्यावर संतापला –

व्हिडीओमध्ये असे दिसून आले की लाबुशेन आणि ख्वाजा ड्रेसिंग रूमच्या दिशेने चालू लागताच एका चाहत्याने त्यांना ‘बोरिंग’ म्हणत चिडवायला सुरुवात केली. ज्यावर लाबुशेन ताबडतोब मागे वळून शिट्टी वाजवून विचारू लागला काय म्हणालास? यानंतर ख्वाजाने त्या चाहत्याला शांत राहण्यास सांगितले. त्यानंतर फॅनने लाबुशेनची माफी मागितली, पण त्याचा राग शमला नाही. लाबुशेन पुढे म्हणाला, तुम्ही हे सर्वांसाठी करणार आहात. यानंतर ख्वाजाने लाबुशेन पकडून तेथून नेले. तरीही या चाहत्याचे डिवचने कमी झाले नाही. त्यानंतर आलेल्या खेळाडूंनाही त्याने अशाच प्रकारे चिडवले.

हेही वाचा – Virat Kohli: बार्बाडोसमध्ये एका चाहत्याने विराट कोहलीला दिली खास भेटवस्तू VIDEO होतोय व्हायरल

चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा संघ मजबूत स्थितीत –

सामन्याबद्दल बोलायचे, तर इंग्लडचा दुसरा डाव ३९५ धावांवर आटोपला. त्यानंतर इंग्लंडने ऑस्ट्रेलियासमोर ३८४ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवशी या लक्ष्याचा पाठलाग करताना पावसाने खेळ थांबण्यापूर्वी एकही विकेट न गमावता ३८ षटकानंतर १३५ धावा केल्या आहेत. आता त्यांना विजयासाठी 249 धावांची गरज आहे. डेव्हिड वॉर्नर ५८ आणि उस्मान ख्वाजा ६९ धावा करत खेळत आहे. सध्या पावसामुळे सामना थांबवण्यात आला आहे. या सामन्यात इंग्लंडचा संघ कसा पुनरागमन करतो, हे पाहावे लागेल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marnus labuschagne getting angry after being insulted by an england fan video went viral vbm

First published on: 30-07-2023 at 20:57 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×