scorecardresearch

राजस्थानमध्ये डेझर्ट स्टॉर्मच्या थराराला सुरुवात

दूरवर पसरलेला वाळवंटाचा विस्तीर्ण कॅनव्हास आणि त्यावरून अवघड खाचखळग्यांचा सामना करत वाटचाल करणारे रॅलीपटू. मारुती-सुझुकी ११व्या डेझर्ट स्टॉर्म थराराच्या निमित्ताने राजस्थानमध्ये राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय सहभागी खेळाडूंनी प्राथमिक टप्पा पार केला.

वाळवंटातील वादळाशी सामना करत लक्ष्य गाठण्याचे उद्दिष्ट असलेल्या या रॅलीची सोमवारी दिल्लीत औपचारिक सुरुवात झाली. यानंतर रॅलीपटूंनी राजस्थानमधील सरदारशहर या गावाकडे कूच केले. सोमवारी मध्यरात्री रॅलीची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. काही तासांपूर्वीच झालेल्या पावसाने वाळू ओलसर झाली होती. या बदललेल्या परिस्थितीचा अंदाज घेत एक्सट्रीम गटातील रॅलीस्वारांनी सरदारशहराच्या परिसरातील टप्प्यामध्ये मार्गक्रमण केले. पावसामुळे झालेले ढगाळ वातावरण, धूळ यांचा सामना करत रॅलीपटूंनी आपले ड्रायव्हिंग कौशल्य पणाला लावत हा टप्पा पार केला. गतविजेता सुरेश राणाने या टप्प्यात आघाडी मिळवली. जेतेपदासाठी राणाला प्रबळ दावेदार असणाऱ्या गौरव गिलच्या गाडीत तांत्रिक बिघाड झाल्याने तो पिछाडीवर पडला.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-02-2013 at 02:09 IST
ताज्या बातम्या