नवी दिल्ली : भारताची तारांकित बॉक्सिंगपटू मेरी कोमच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय देखरेख समिती भारतीय कुस्तीगीर महासंघाचा तात्पुरता कार्यभार सांभाळणार असून, महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपांची चौकशीही करणार आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने सोमवारी याबाबतची घोषणा केली.

कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी नियुक्त शासकीय समितीत मेरीसह ऑलिम्पिकपटू कुस्तीगीर योगेश्वर दत्त, माजी बॅडिमटनपटू तृप्ती मुरगुंडे, केंद्र सरकारच्या लक्ष्य ऑलम्पिक व्यासपीठ योजनेचे (टॉप्स) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी राजगोपालन, क्रीडा प्राधिकरणाच्या माजी संचालिका राधिका श्रीमन यांचा समावेश आहे. क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी ही माहिती दिली.

Rohit Pawar Post Against Raj Thackeray
“तंबाखूच्या पुडीवर ‘आरोग्यास हानिकारक’ असं..”, राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्यावर रोहित पवारांची पोस्ट
Raj Thackeray Ankita walavalkar
“राज ठाकरेंनी महायुतीच्या सत्तेत सहभागी होण्यापेक्षा…”, कोकण हार्टेड गर्लची खास इच्छा; अमित शाहांबरोबरच्या भेटीवर म्हणाली…
Damania plea
दोषमुक्तीविरोधात दमानिया यांच्या याचिकेची उच्च न्यायालयाकडून दखल, भुजबळ कुटुंबीयांना नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश
parful patel
प्रफुल पटेल यांना निर्दोषत्व! विमान भाडेकरार घोटाळाप्रकरणी सीबीआयकडून फाइल बंद

जंतरमंतर येथे धरणे आंदोलन करणाऱ्या कुस्तीगिरांचे म्हणणे ऐकल्यानंतर अनुराग ठाकूर यांनी या प्रकरणाची सर्वंकष चौकशी करण्याचे आश्वासन कुस्तीगिरांना दिले होते. त्यानंतरच बंडखोर कुस्तीगिरांनी आपले आंदोलन मागे घेतले.‘‘देखरेख समितीला चार आठवडय़ांची मुदत देण्यात आली आहे. पुढील महिन्यात ही समिती आपले काम सुरू करेल. महासंघ आणि महासंघाच्या अध्यक्षांवर असलेल्या आरोपांची ही समिती सखोल चौकशी करून आपला अहवाल शासनाला सादर करणार आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत हीच समिती कुस्ती महासंघाचे रोजचे व्यवहार व कामकाज पाहिल,’’ असे ठाकूर यांनी सांगितले.