अहमदाबाद : भारतीय संघ बुधवारी तिसऱ्या आणि निर्णायक ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट लढतीत न्यूझीलंडचा सामना करेल, तेव्हा संघाचे लक्ष्य मालिकेत विजय मिळवण्याचे असेल. या सामन्यात भारताच्या शीर्ष फळीतील फलंदाजांकडून संघाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.

इशान किशन, शुभमन गिलकडून अपेक्षा

रोहित शर्मा, विराट कोहली आणि लोकेश राहुल यांसारख्या अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत शुभमन गिल, इशान किशन आणि राहुल त्रिपाठी यांना संधीचा फायदा उचलता आलेला नाही. बुधवारी सामना झाल्यानंतर बराच काळ भारत ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळणार नाही. त्यामुळे युवा खेळाडूंना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत आपली छाप पाडण्याची अंतिम संधी असेल. बांगलादेशमध्ये द्विशतक झळकावल्यानंतर इशानला लय कायम राखता आलेली नाही. तर, फिरकी गोलंदाजीचा सामना करताना गिललाही अडथळय़ांचा सामना करावा लागत आहे. गिल एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगल्या लयीत असला तरीही, ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये त्याला लय सापडलेली दिसत नाही. तिसऱ्या स्थानी फलंदाजी करणाऱ्या कोहलीच्या अनुपस्थितीत मिळालेल्या संधीचा फायदा त्रिपाठीला मिळवता आलेला नाही.

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
MI vs CSK: आयपीएल २०२४ मध्ये ऋतु’राज’, मुंबईविरूद्ध विस्फोटक फलंदाजीसह ‘हा’ विक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडू
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक
Rishabh becomes first player to play 100th match for Delhi
IPL 2024 : ऋषभ पंतने झळकावले अनोखे ‘शतक’, दिल्ली कॅपिटल्ससाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला खेळाडू
Virat Reveals Time Spent With Family
IPL 2024 : ‘लोक आम्हाला ओळखत नव्हते’, विराट कोहली दोन महिने कुठे होता? स्वत:च उघड केले गुपित

चहल, कुलदीपच्या फिरकीवर मदार

मालिकेतील खेळपट्टय़ांबाबत टीका होत असल्याने नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पुन्हा एकदा फिरकी गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टी मिळते की नाही याकडे सर्वाचे लक्ष असेल. गोलंदाजी विभागात यजुर्वेद्र चहल आणि कुलदीप यादव एकत्र खेळल्यास भारताला विरोधी संघांवर दबाव निर्माण करण्यास मदत मिळताना दिसत आहे. दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर केवळ दोन षटके गोलंदाजी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. चहलने गेल्या सामन्यात आक्रमक सलामी फलंदाज फिन अ‍ॅलनलाही बाद केले होते. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने गेल्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली होती. मालिकेत पुनरागमन करणाऱ्या पृथ्वी शॉ ला संधी देण्याची मागणी होत असली तरीही, निर्णायक सामन्यात कर्णधार हार्दिक पंडय़ा अंतिम एकादशमध्ये बदल करण्याची शक्यता कमीच आहे.

दुसरीकडे, न्यूझीलंडला आपल्या मध्यक्रमाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. ग्लेन फिलिप्सने अजून फलंदाजीत चमक दाखवलेली नाही आणि संघाला अखेरच्या सामन्यात त्याच्याकडून योगदानाची अपेक्षा असणार आहे. एकदिवसीय मालिकेत आपल्या खेळीने सर्वाचे लक्ष वेधणारा मायकल ब्रेसवेल मोठे फटके मारण्यास सक्षम आहे. न्यूझीलंडने गेल्या सामन्यात आठ गोलंदाजांचा उपयोग केला होता. दोन वर्षांपूर्वी या मैदानावर खेळवण्यात आलेल्या ट्वेन्टी-२० सामन्यात २०० हून अधिक धावा झाल्या होत्या.

’ वेळ : सायं. ७ वा.

’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्या)