Matt Henry Creates History: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) जाहीर केलेल्या ताज्या कसोटी क्रमवारीत एक ऐतिहासिक बदल दिसून आला आहे. कसोटी क्रिकेटला गोलंदाजीमध्ये एक नवीन ‘नंबर-१’ गोलंदाज मिळाला असला, तरी भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. आयसीसीच्या या महत्त्वपूर्ण अपडेटमुळे कसोटी प्रकाराला दोन वर्ल्ड नंबर वन गोलंदाज मिळाले आहेत. यासह त्याने ३६ वर्षांनंतर अशी कामगिरी करणारा पहिला गोलंदाज होण्याचा मान मिळवला आहे.
लंडनच्या ‘द ओव्हल’ मैदानावर इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात घातक गोलंदाजी करत ११ बळी घेण्याच्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीला मोठे यश मिळाले आहे. ३४ वर्षीय हेन्रीने आयसीसी (ICC) कसोटी गोलंदाजी क्रमवारीत थेट अव्वल स्थान गाठले आहे. विशेष म्हणजे, हेन्रीने जसप्रीत बुमराहला पहिल्या स्थानावरून हटवलेले नाही; त्याऐवजी, तो आता बुमराहसोबत संयुक्तपणे अव्वल क्रमांकाचा कसोटी गोलंदाज बनला आहे.
लंडनच्या ‘द ओव्हल’ मैदानावर इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भेदक गोलंदाजी करत ११ बळी घेण्याच्या ऐतिहासिक कामगिरीचं मॅट हेन्रीला मोठं बक्षीस मिळालं आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीने या कसोटीत पहिल्या डावात ५ विकेट्स आणि दुसऱ्या डावात ६ विकेट्स घेतल्या होत्या, त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर न्यूझीलंड संघाने इंग्लंडविरूद्ध मोठा विजय नोंदवला. ३४ वर्षीय हेन्रीने आयसीसी (ICC) कसोटी गोलंदाजी क्रमवारीत थेट अव्वल स्थान गाठलं आहे. विशेष म्हणजे, हेन्रीने जसप्रीत बुमराहला पहिल्या स्थानावरून हटवलेले नाही; त्याऐवजी, तो आता बुमराहसोबत संयुक्तपणे अव्वल क्रमांकाचा कसोटी गोलंदाज बनला आहे.
सध्या बुमराह आणि मॅट हेन्री हे दोघेही ८७० रेटिंग पॉइंट्ससह बरोबरीवर आहेत, म्हणजेच हे दोन्ही गोलंदाज कसोटी क्रमवारीत संयुक्तपणे अव्वल स्थानावर आहेत. नोव्हेंबर २०२४ मध्ये कागिसो रबाडाला मागे टाकून अव्वल स्थान पटकावलेला बुमराह अजूनही हेन्रीसह पहिल्या स्थानी कायम आहे. दरम्यान, मॅट हेन्री कसोटी क्रिकेटमधील अव्वल क्रमांकाचा गोलंदाज बनणं ही न्यूझीलंड क्रिकेटसाठी एक ऐतिहासिक घटना ठरली आहे.
मॅट हेन्री वर्ल्ड नंबर वन कसोटी गोलंदाज होताच त्याने मोठा विक्रम केला आहे. मॅट हेन्री हा गेल्या ३६ वर्षांत आयसीसी (ICC) कसोटी गोलंदाजी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचणारा न्यूझीलंडचा पहिला गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी फक्त न्यूझीलंड संघाचे दोन गोलंदाज पहिलं स्थान गाठण्यात यशस्वी ठरले होते. जॅक कोवी यांनी १९४७ मध्ये पहिलं स्थान गाठलं होतं. यानंतर ३६ वर्षांपूर्वी म्हणजेच १९८४-९० दरम्यान रिचर्ड हॅडली यांनी वर्ल्ड नंबर वन होण्याचा मान पटकावला होता.
