Matthew Short 5 Wicket Haul in ENG vs AUS 2nd T20I: इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडने दमदार पुनरागमन करत ऑसी संघाचा पराभव केला. पहिला टी-२० सामना जिंकलेल्या ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने चांगलाच धक्का दिला. पण तरीही ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूने इतिहास घडवत मोठी कामगिरी आपल्या नावे केली आहे. कार्डिफमध्ये खेळल्या गेलेल्या या रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा यजमान इंग्लंडने ३ विकेट्सने पराभव केला.

ऑस्ट्रेलिया संघाने हा सामना गमावला असला तरी सलामीवीर मॅथ्यू शॉर्टने गोलंदाजीत नवा विक्रम रचला. मॅथ्यू शॉर्ट ऑस्ट्रेलियासाठी गोलंदाजी करण्यासाठी आला आणि त्याने २२ धावा देत इंग्लंडच्या अर्ध्या संघाला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यासह या सलामीवीराने ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच गोलंदाज म्हणून उत्कृष्ट कामगिरी नोंदवली.

IND vs BAN Basit Ali Slams Bangladesh Captain Najmul Hossain Shanto
IND vs BAN : ‘शांतोने भारताबरोबर ‘तो’ माईंड गेम खेळायला नको होता’, बासित अलीने बांगलादेशच्या कर्णधारावर साधला निशाणा
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
Rohit Sharma Statement on India win Over Bangladesh in Kanpur Test IND vs BAN
IND vs BAN: “भले आम्ही १०० वर ऑल आऊट झालो असतो पण…”, भारताच्या विजयानंतर रोहित शर्माचं मोठं विधान, नेमकं म्हणाला तरी काय?
Pratham Singh Scores Maiden Duleep Trophy Century for India A vs India D Match
Duleep Trophy 2024: शुबमन गिलच्या जागी आलेल्या ३२ वर्षीय बदली खेळाडूने झळकावले दुलीप ट्रॉफीतील पहिले शतक, जाणून घ्या कोण आहे?
Sunil Gavaskar slams Michael Vaughan for comment on Test cricket
Sunil Gavaskar Michael Vaughan : कसोटीत रुटने सचिनला मागे टाकले तर काय बदलेल? मायकेल वॉनच्या वक्तव्याला सुनील गावसकरांनी दिले चोख प्रत्युत्तर
Ajit Pawar Amol Kolhe
Amol Kolhe : अजित पवार म्हणाले, “आता आपणच साहेब”, अमोल कोल्हे प्रत्युत्तर देत म्हणाले, “राज्यात दोनच साहेब, एक शरद पवार, दुसरे…”

हेही वाचा – Virat Kohli: भारतीय क्रिकेटपटूच्या अभिनेत्री सासूबाईंचा विराटबरोबर सेल्फी, पोस्ट शेअर करत म्हणाल्या…

ENG vs AUS: मॅथ्यू शॉर्टची ऐतिहासिक कामगिरी

शॉर्ट ऑस्ट्रेलियाकडून ७वा गोलंदाज म्हणून गोलंदाजी करायला आला आणि त्याने अवघ्या २२ धावांत ५ विकेट घेतले. शॉर्टने इंग्लंडचे सलामीवीर फिलिप सॉल्ट, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बॅटॉल, सॅम कुरन आणि ब्रायडन कारसे यांना बाद केले. या ५ विकेट्ससह पुरुष क्रिकेटच्या इतिहासात संघातील ७वा गोलंदाज म्हणून ५ विकेट घेणारा तो पहिला ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ठरला.

हेही वाचा – Vinesh Phogat: विनेश फोगटचे पीटी उषा यांच्यावरील आरोप खोटे? वकिल हरिश साळवे यांनी सांगितलं नेमकं काय घडलं?

ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात ७ गोलंदाजांचा वापर केला, ज्यामध्ये शॉर्ट शेवटचा गोलंदाज म्हणून गोलंदाजी करण्यासाठी आला. इतकेच नाही तर मॅथ्यू शॉर्ट पुरुषांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ५ विकेट घेणारा पूर्ण सदस्य राष्ट्राचा पहिला सलामीवीर ठरला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे शॉर्टने केवळ ३ षटके टाकली आणि ५ फलंदाजांना केवळ २२ धावा देत बाद केले.

हेही वाचा – ‘फक्त एका सामन्यानंतर…’, मुलावर झालेल्या अन्यायासाठी मोईन खानने रमीझ राजाला धरले जबाबदार; म्हणाला, ‘त्याने युवा…’

प्रथम फलंदाजी करताना जेक फ्रेझर-मॅकगर्कचे अर्धशतक आणि जोश इंग्लिशच्या ४२ धावांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने २० षटकांत ६ गडी गमावून १९३ धावा केल्या. प्रत्युत्तरात लियाम लिव्हिंगस्टोनच्या झंझावाती खेळीच्या जोरावर इंग्लंडने १९ षटकांत ७ गडी गमावून १९४ धावांचे लक्ष्य गाठले. लियामने ४७ चेंडूत ५ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने ८७ धावांची खेळी केली. अशाप्रकारे इंग्लंड संघ मालिकेत दमदार पुनरागमन करण्यात यशस्वी ठरला.