Mayank Yadav Wicket: भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रांची येथे सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून संजू सॅमसन, इशान किशन आणि तिलक वर्माच्या फटकेबाजीचा बोलबाला पाहायला मिळाला. भारतीय संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना २४९ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा बचाव करताना, मयंक यादवने सुरूवातीलाच वेस्ट इंडिजला मोठे धक्के दिले. यादरम्यान शिमरॉन हेटमायरला बाद केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मयंक यादवचा भन्नाट चेंडू..
मयंक यादव आपल्या वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो. सुरूवातीलाच २ धक्के बसल्यानंतर शे होप आणि पॉवेलने तुफान फटकेबाजी करून संघाची धावसंख्या ५० धावांच्या पार पोहोचवली. दोघांनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. दरम्यान पहिल्याच षटकांत मयंक यादवने वेस्ट इंडिजला लागोपाठ २ मोठे धक्के दिले. तर झाले असे की, डावातील तिसरा चेंडू त्याने वेगाने आपटला. कमिल पूरनने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण रवी बिश्नोईने घेतलेल्या भन्नाट कॅचमुळे तो ४ धावांवर माघारी परतला. त्यानंतर शिमरॉन हेटमायर फलंदाजीला आला. तो येणार आणि सेट होणार, त्याआधीच मयंक यादवने त्याला भन्नाट वेगवान चेंडू टाकून जोरदार धक्का दिला. षटकातील चौथा चेंडू त्याने मधल्या स्टंपवर टाकला. हा चेंडू टप्पा पडताच वेगाने आता आला. चेंडू बॅटची कडा घेऊन वेगाने यष्टीला जाऊन धडकला. हे पाहून हेटमायर देखील आश्चर्यचकीत झाला. मुख्य बाब म्हणजे हे दोन्ही चेंडू त्याने ताशी १४५ च्या गतीने टाकले होते.
पावरप्लेमध्ये पूर्ण केलं अर्धशतक
वेस्ट इंडिजचा संघ २५० धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला होता. पण वेस्ट इंडिजला जशी हवी होती तशी सुरूवात मिळाली नाही. मयंक यादवने पहिल्याच षटकात वेस्ट इंडिजच्या २ प्रमुख फलंदाजांना माघारी धाडलं. आधी कमिल पूरन त्यानंतर पुढच्याच चेंडूवर हेटमायर माघारी परतला. सुरूवातीलाच २ धक्के बसल्यानंतर शे होप आणि रोमन पॉवेलने मिळून वेस्ट इंडिजचा डाव सावरला. दोन्ही फलंदाजांनी मिळून पाचव्या षटकांत ५० धावांचा पल्ला गाठून दिला. पण त्यानंतर त्याने पॉवेललाही बाद करत माघारी धाडलं.
भारतीय संघाने केल्या २४९ धावा
या सामन्यात भारतीय संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. सलामीला आलेला अभिषेक शर्मा अवघ्या २० धावा करून माघारी परतला. तर संजू सॅमसनने ८२ धावांची वादळी खेळी केली. तर इशान किशनने ४३ धावा केल्या. शिवम दुबे ७ धावा करून माघारी परतला. इशान किशनने ४३ धावांची खेळी केली. शेवटी तिलक वर्मा आणि श्रेयस अय्यरने वादळी फटकेबाजी केली. श्रेयस अय्यरने ४० आणि तिलक वर्माने नाबाद ४४ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने ५ गडी बाद २४९ धावा केल्या.
