मुंबई क्रिकेट असोसिएशची निवडणूक तोंडावर आली आहे. त्याचदरम्यान अनेक घडामोडी घडत आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपाचे मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांचा पॅनल एकत्र लढत आहेत. त्यांच्याकडून अमोल काळे हे एमसीए अध्यक्षपदाचे उमेदवार असतील. तर, त्यांच्यासमोर माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांचे आव्हान असणार आहे.

शरद पवार यांच्या पॅनलने सुरुवातीला अध्यक्षपदासाठी संदीप पाटील यांना पाठिंबा दिला होता. मात्र, आशिष शेलार यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर शरद पवारांनी निर्णय बदलला. शरद पवार आणि आशिष शेलार पॅनल एकत्र आले. आशिष शेलार बीसीसीआय खजिनदार झाल्याने त्यांच्याजागी अमोल काळे अध्यक्षपदासाठी उमेदवार असतील. त्यामुळे संदीप पाटील आणि अमोल काळे यांच्यात अध्यक्षपदासाठी लढत होणार आहे. या सर्व प्रकरणावर संदीप पाटील यांनी भाष्य केलं आहे.

Sharad pawar slams Narendra modi at Madha
‘मतदान करायला जाताना सिलिंडरला नमस्कार करा’, शरद पवारांनी ऐकवलं मोदींचं ‘ते’ भाषण
rohit pawar latest marathi news
रोहित पवारांना मुख्यमंत्री व्हायचं असल्याने ते अजित पवारांवर टीका करतात – सुनील शेळके
Sharad Pawar Answer to Ajit Pawar
शरद पवारांचं अजित पवारांना उत्तर, “घरातील लेक ही वंशाचाच नव्हे तर विचारांचाही दिवा तेवत ठेवू शकते, कारण..”
Sunita Kejriwal
अरविंद केजरीवालांचा तुरुंगातून संदेश; पत्नी सुनीता म्हणाल्या, “मुख्यमंत्र्यांनी आप आमदारांना आपापल्या मतदारसंघात…”

हेही वाचा : टीम इंडियाचा ‘हा’ तगडा खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळणार नाही, जाणून घ्या काय आहे कारण

संदीप पाटील म्हणाले की, “एमसीए निवडणुकीसाठी आमच्या कोअर कमिटीने निवडलेल्या उमेदवारांचे मुंबई क्लबशी नातं राहिलं आहे. माझा अनुभव आणि त्यांचं नातं एकत्र आल्यानंतर बरेच बदल करण्यासारखं आहेत. मुंबई क्रिकेटचा व्याप वाढला असून, सर्व क्लबनी एकत्र आलं पाहिजे. मुंबई ही एक खेळाडू तयार करणारी फॅक्टरी आहे. या क्लबकडे तुम्ही दुर्लक्ष केलं तर ती फॅक्टरी बंद होईल. विजय मर्चंट पासून पृथ्वी शॉपर्यंत हे क्लब क्रिकेट खेळून कसोटी क्रिकेटकडे आले आहेत.”

अकरा वर्षानंतर क्रिकेटपटू विरुद्ध राजकारणी यांच्यात ‘सामना’ रंगणार आहे. यावर बोलताना पाटील यांनी म्हटलं, “राजकारण घराघरात असते. दबाव प्रत्येक सामन्यात असतो. त्यामुळे राजकारण बाजूला ठेऊन काम करणे क्रिकेटसाठी महत्वाचे आहे. पद महत्वाचे नाही आहे. क्रिकेटमध्ये ११ खेळाडू असतात त्यांना गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाचे काम असते. तिन्ही एकत्र काम केलं की विजयाची संधी मिळते.”

हेही वाचा : “भारतीय संघ पाकिस्तानात आला नाही, तर आम्ही…”, जय शाहांच्या ‘त्या’ भूमिकेनंतर पाकिस्तान मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

शरद पवार आणि आशिष शेलार युतीवर बोलताना पाटील यांनी सांगितलं की, “शरद पवारांनी मुंबई, बीसीसीआय आणि आयसीसीसाठी योगदान दिलं आहे. मात्र, शरद पवारांनी आशिष शेलारांसह युती का केली, याची माहिती नाही. कारण, युतीबाबतचे सर्व निर्णय माझी कोअर कमिटी घेत होती. कोणाबरोबरही जाण्याचा त्यांचा हक्क आहे. क्रिकेटमध्ये फलंदाजाला बाद करण्याचे खूप प्रयत्न होतात. कधी कधी अंपायर चुकीचा निर्णय सुद्धा देतो,” असेही उमेदवारी बाद करण्याच्या प्रयत्नांवर संदीप पाटील यांनी साांगितलं. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.