पाकिस्तान संघातील ‘या’ महिला खेळाडूंना बघितलंत का?

रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना

महिला वर्ल्डकप स्पर्धेत (ICC Womens World Cup) रविवारी भारताचा (india womens team) सामना पाकिस्तानशी (pakistan womens team) होणार आहे. स्पर्धेत इंग्लंड आणि वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये भारतीय महिला संघानं जबरदस्त कामगिरी करत विजय मिळवले आहेत. भारतीय संघाची कर्णधार मिताली राज, स्मृती मंधाना आणि पुनम राऊत या जबरदस्त फार्मात आहेत. तर पाकिस्तानची कर्णधार साना मिर, बिसमाह मारुफ, नैन आबिदी यांच्याकडे सामना खेचून आणण्याची क्षमता आहे. त्यामुळे त्यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल.

भारत आणि पाकिस्तानच्या महिला क्रिकेट संघात २००५ ते २०१७ या बारा वर्षांत केवळ नऊ एकदिवसीय सामने झाले आहेत. यात पाकिस्तानला सपाटून मार खावा लागला आहे. या स्पर्धेत भारतीय संघाने केलेल्या कामगिरीच्या तुलनेत पाकिस्तानी संघ दुबळा वाटत असला तरी, पाकिस्तानची कर्णधार साना मिर, बिसमाह मारुफ, नैन आबिदी यांचा अनुभव आणि त्यांची आतापर्यंतची कामगिरी बघता त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पाकिस्ताननं वर्ल्डकप स्पर्धेत सुरुवातीचे दोन सामने गमावले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला आहे. तर इंग्लंडनंही नमवलं आहे. स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी त्यांना भारताविरुद्ध चांगली कामगिरी करावी लागणार आहे. भारताविरुद्ध दोन हात करण्यासाठी सज्ज असलेल्या पाकिस्तान संघातील महिला खेळाडूंबाबत आपण जाणून घेऊयात….

असा असेल पाकिस्तानी संघ:

साना मिर, अस्माविया इक्बाल, आयेशा जाफर, डायना बेग, गुलाम फातिमा, इराम जावेद, जवेरिया खान, कायनात इम्तियाझ,मरिना इक्बाल, नाहिदा खान, नैन आबिदी, नशरा संधू, सादिया युसूफ, सिद्रा नवाज, वाहिदा अख्तर, बिसमाह मारुफ.

mir1

 पाकिस्तानची कर्णधार साना मिर ((Source: Reviewit.pk)

 

sana-mir-1

साना मिर आणि मारुफ 

 

(Source: Reviewit.pk)
(Source: Reviewit.pk)

Pakistan captain Sana Mir (R) adjusts her hair during a training session, a day before their World Cup T-20 match aagainst India, at Ferozeshah Kotla stadium in New Delhi on March 18th 2016. Express photo by Ravi Kanojia.

jaweria-khan-new

जवेरिया खान. (Photo Courtesy: Facebook)

कर्णधार साना मिर:

 

पाकिस्तान संघाची कर्णधार साना मिरनं आतापर्यंत ९७ एकदिवसीय सामने खेळले आहेत. १२३२ धावा केल्या आहेत. गोलंदाजीतही तिने चांगली कामगिरी केली आहे. १०६ बळी मिळवले आहेत. ३२ धावांत ५ गडी बाद ही तिची सर्वोच्च कामगिरी आहे. टी-ट्वेंटीतही तिनं ७५ सामन्यांत ६६४ धावा केल्या आहेत. तर ६६ गडी बाद केले आहेत.

बिसमाह मारूफ :

ही अवघ्या २५ वर्षांची आहे. तिने आतापर्यंत ९२ एकदिवसीय सामने खेळले आहेत. २०८२ धावा केल्या आहेत. त्यात ११ अर्धशतकांचा समावेश आहे. ९९ ही तिची सर्वोच्च धावसंख्या आहे.

आयेशा जाफर:

अवघ्या २२ वर्षांची असलेली आयेशा जाफरने १३ सामने खेळले आहेत. ३१० धावा केल्या आहेत. यात ३ अर्धशतकांचा समावेश आहे.

नैन आबिदी:

पाकिस्तानकडून नैन आबिदीनं ८२ सामने खेळले आहेत. १५५६ धावा केल्या असून, त्यात एक शतक आणि ८ अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद १०१ धावा ही तिची सर्वोच्च खेळी आहे.

मरिना इकबाल:

मरिनानं ३४ सामन्यांत ४२७ धावा केल्या आहेत. त्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे. गोलंदाजीतही तिनं कमाल दाखवली आहे. ७ विकेट तिनं मिळवले आहेत. ६९ ही तिची सर्वोच्च धावसंख्या आहे.

कायनात इम्तियाज :

अष्टपैलू कायनात इम्तियाजनं आतापर्यंत फक्त ६ सामने खेळले आहेत. त्यात अवघ्या २० धावा तिला करता आल्या आहेत. पण गोलंदाजीत तिनं ४ विकेट्स मिळवल्या आहेत.

नाहिदा खान:

नाहिदानं ३४ सामन्यांमध्ये ५५० धावा केल्या आहेत. त्यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. ७९ ही तिची सर्वोच्च धावसंख्या आहे.

जवेरिया खान :

जवेरियानं ७८ सामन्यांत १९८७ धावा केल्या आहेत. त्यात १२ अर्धशतके आणि एक शतक ठोकले आहे. गोलंदाजीतही तिने १३ गडी बाद केले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Meet the pakistan womens cricket team captain sana mir bismah maroof kaynat imtiaz

ताज्या बातम्या