scorecardresearch

Premium

Asian Games 2023: भारतीय महिला संघाने नेमबाजीत १० मीटर रायफलमध्ये पटकावले रौप्यपदक

Asian Games 2023 Updates: आशियाई क्रीडा स्पर्धा सुरू होताच भारतीय खेळाडूंनी पदकावर नाव कोरण्यास सुरुवात केली. नेमबाजीत महिला संघाने देशाचा झेंडा फडकावला, तर रोईंगमध्ये अर्जुन आणि अरविंद या जोडीने चीनला शानदार झुंज दिली.

Mehuli Ghosh Ramita and Aashi Choksi of Indian women's team won the silver medal
भारतीय महिला संघातील नेमबाज (फोटो-अमित शाह ट्विटर)

Silver medal for India in 10m rifle: आशियाई खेळांची रंगतदार सुरुवात झाली आहे. २४ सप्टेंबर हा दिवस भारतासाठी संस्मरणीय ठरत आहे. एकीकडे भारत आणि बांगलादेशच्या महिला संघांमध्ये क्रिकेटमध्ये चुरशीची स्पर्धा पाहिला मिळाली. दुसरीकडे भारताला रौप्यपदक मिळाले आहे. तसेच भारताने महिला नेमबाजीत पहिले रौप्य पदक जिंकले. त्याचवेळी पुरुषांच्या हलक्या वजनाच्या स्पर्धेत भारताने रौप्यपदक पटकावले. दुसरीकडे भारतानेही बांगलादेशवर मात करत अंतिम फेरी गाठली आहे. आतापर्यंत भारताने एकूण ५ पदके जिंकली आहेत.

भारतीय महिला संघात मेहुली घोष, रमिता आणि आशी चोक्सी यांनी १० मीटर रायफलमध्ये रौप्य पदक जिंकले. या काळात भारताची एकूण गुणसंख्या १८८६.० होती. यानंतर रोईंगमध्ये भारताने बाजी मारली, भारताच्या अरविंद सिंग आणि अर्जुन लाल यांनीही लाइट वेट डबल स्कलमध्ये रौप्यपदक जिंकले. त्यांनी ६:२८:२८ वेळेसह रौप्य पदक जिंकले. याशिवाय भारताकडे अजून पदके जिंकण्याची मोठी संधी आहे. भारताची बॉक्सिंग चॅम्पियन निखत झरीनवरही सर्वांच्या नजरा असतील. त्याच वेळी, पुरुष आणि महिला फुटबॉल संघ देखील गट सामन्यांमध्ये सहभागी होतील.

India's milestone of 100 medals complete in 19th Asian Games 2023
Asian Games: भारतीय महिला कबड्डी संघाची सुवर्ण कामगिरी, टीम इंडियाने पूर्ण केले पदकांचे शतक
Badminton Prannoy's injury spoiled the game Indian men's badminton team missed the gold China defeated in the final
Asian Games 2023: प्रणॉयच्या दुखापतीने भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाचे सुवर्णपदक हुकले, फायनलमध्ये चीनकडून पराभव
Asian Games 2023 Updates
Asian Games स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ चीनमध्ये पोहोचला, नीरज चोप्रासोबत दिसली टीम इंडिया
Asian Games 2023: Indian hockey team gave a crushing defeat to Singapore registered a spectacular victory of 16-1
Asian Games, Hockey: चक दे इंडिया! हॉकीत भारतीय संघाचा दबदबा कायम, एक-दोन नव्हे पुन्हा १६ गोल करत सिंगापूरचा उडवला धुव्वा

बाबूलाल यादव आणि लेख राम या जोडीला मिळाले कांस्यपदक –

भारताच्या बाबूलाल यादव आणि लेख राम यांना कॉक्सलेस जोडीमध्ये कांस्यपदक मिळाले, ज्यांनी ६:५०.४१ सेकंदाची वेळ नोंदवली. चीनने सुवर्णपदक तर उझबेकिस्तानने रौप्यपदक जिंकले. भारताने रोइंगमध्ये ३३ सदस्यीय संघ पाठवला आहे. आशियाई क्रीडा २०२३ मध्ये भारताने आतापर्यंत एकूण ५ पदके जिंकली आहेत. ३ रौप्य आणि २ कांस्यपदक आले आहेत. बांगलादेशचा पराभव करून भारतीय महिला क्रिकेट संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. म्हणजे क्रिकेटमध्येही पदक निश्चित झाले आहे.

हेही वाचा – Asian Games 2023: दुखापतीमुळे करु शकला नाही सराव तरीही अरविंदने देशासाठी पटकवाले पदक, रोइंगमध्ये भारताची शानदार हॅट्ट्रिक

चीनचा दबदबा –

चीनने आशियाई क्रीडा स्पर्धेची शानदार सुरुवात केली आहे. महिलांच्या नेमबाजीत चीनचा दबदबा दिसून आला. रमिता, मेहुली आणि चौकसे या त्रिकुटाने १८८६ गुण मिळवून रौप्यपदक जिंकले आणि चीनच्या (१८९६.६) मागे दुसरे स्थान गाठले. त्याच वेळी, लाइटवेट पुरुष दुहेरी स्कल्समध्ये चीन देखील पुढे राहिला, यजमानांनी अर्जुन आणि अरविंदपेक्षा ५:०२ सेकंद वेगवान राहून सुवर्णपदक जिंकले.

हेही वाचा – IND vs AUS 2nd ODI: ऑस्ट्रेलियाचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

भारताने जिंकली ५ पदके –

१० मीटर एअर रायफल टीम इव्हेंट (शूटिंग): रौप्य
पुरुषांची लाइटवेट डबल स्कल्स (रोइंग): रौप्य
पुरुष कॉक्सलेस दुहेरी (रोइंग): कांस्य
पुरुष कॉक्सड ८ संघ (रोइंग): रौप्य
महिला १० मीटर एअर रायफल (शूटिंग): कांस्य

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mehuli ghosh ramita and aashi choksi of indian womens team won the silver medal in 10m rifle in asian games vbm

First published on: 24-09-2023 at 14:33 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×