न्यूझीलंडविरुद्ध आज होणाऱ्या लढतीत विजय महत्त्वाचा

पीटीआय, भुवनेश्वर

वेल्सविरुद्ध केलेल्या कामगिरीनंतर उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवण्यात अपयशी ठरलेल्या भारतीय संघाला ‘एफआयएच’ पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेतील आपले आव्हान टिकवून ठेवायचे असल्यास रविवारी न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या ‘क्रॉसओवर’ सामन्यात विजय महत्त्वाचा आहे.भारताला उपांत्यपूर्व फेरीत थेट प्रवेश मिळवण्याकरिता ड-गटातील आपल्या अंतिम सामन्यात वेल्सविरुद्ध आठ गोलच्या फरकाने विजय मिळवणे गरजेचे होते. मात्र, भारताच्या आघाडीपटूंनी चांगला खेळ केला नाही आणि भारताला ४-२ अशा फरकाने विजय मिळवता आला. भारताला आता उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी कुठल्याही परिस्थितीत न्यूझीलंडविरुद्ध सामना जिंकणे गरजेचे आहे. भारतीय संघ जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी आहे. तर, न्यूझीलंड १२व्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा संघ कधीही विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला नाही. त्यांनी स्पर्धेत विशेष कामगिरीही केलेली नाही. त्यामुळे किलग स्टेडियममध्ये होणाऱ्या या सामन्यात भारतीय संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार असेल.

Kapil Dev Says Some people will suffer but no one is bigger than the country
Kapil Dev : “काही लोकांना त्रास होईल, परंतु देशापेक्षा कोणीही…”, कपिल देव यांनी बीसीसीआयच्या ‘त्या’ निर्णयाचे केले स्वागत
Kane Williamson being run out Video Viral
NZ vs AUS : केन विल्यमसन सहकारी खेळाडूला धडकला, अन् १२ वर्षात पहिल्यांदाच घडलं ‘असं’, VIDEO होतोय व्हायरल
team india kl rahul bcci
IND Vs ENG : केएल राहुल पाचव्या कसोटीलाही मुकणार, संघात दिग्गज खेळाडूचं पुनरागमन; अशी असेल टीम इंडिया
kl rahul still not fit likely to miss 5th Test against england in dharamsala
केएल राहुल अजूनही जायबंदीच;अखेरच्या कसोटी सामन्यातही खेळण्याची शक्यता कमीच

भारताची आघाडीची फळी संघर्ष करताना दिसत आहे. भारताने न्यूझीलंडला पराभूत केल्यास त्यांची गाठ उपांत्यपूर्व फेरीत गतविजेत्या बेल्जियमशी होणार आहे. इंग्लंड आणि स्पेन संघांनी वेल्सला मोठय़ा फरकाने नमवले, मात्र भारतीय संघाला त्यांच्याविरुद्ध संघर्ष करावा लागला. वेल्सविरुद्ध भारतीय संघ सुरुवातीपासूनच आपल्या रणनीतीनुसार खेळू शकला नाही. आघाडीच्या फळीशिवाय बचावफळीला चुणूक दाखवता आली नाही. त्याचा परिणाम वेल्सला दोन गोल करता आले. हार्दिक सिंगच्या अनुपस्थितीत मनदीप सिंग आणि आकाशदीप सारख्या खेळाडूंची कामगिरी भारतासाठी निर्णायक ठरू शकते. भारत विजयाचा प्रबळ दावेदार असला तरीही, न्यूझीलंडला कमकुवत समजण्याची चूक भारत करणार नाही.

जायबंदी हार्दिक सिंग स्पर्धेबाहेर
भारतीय मध्यरक्षक हार्दिक सिंग दुखापतीतून सावरण्यात अपयशी ठरल्याने शनिवारी तो पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेबाहेर गेला. त्यामुळे रविवारी होणाऱ्या सामन्यापूर्वी भारताला झटका बसला आहे. हार्दिक इंग्लंडविरुद्ध झालेल्या भारताच्या दुसऱ्या सामन्यात जायबंदी झाला होता. हार्दिकच्या जागी राजकुमार पालला संघात स्थान देण्यात आले आहे.

वेळ : सायं. ७ वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स फस्र्ट, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट २ एचडी