ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांच्यातील प्रतिस्पर्ध्याचा नवा अध्याय गुरुवारी एका प्रदर्शनीय सामन्यात एकमेकांसमोर येणार आहे. सौदी अरेबियाच्या अल नासर क्लबमध्ये सामील झाल्यानंतर पोर्तुगालचा दिग्गज खेळाडू रोनाल्डोचा हा पहिलाच सामना असेल. ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांच्यामध्ये कोण श्रेष्ठ आहे, असा वाद १० वर्षांहून अधिक काळ सुरू आहे. डिसेंबर २०२० नंतर प्रथमच गुरुवारी दोघेही आमनेसामने येणार आहेत. मागील सामन्यात युव्हेंटसने बार्सिलोनाचा ३-० असा पराभव केला होता.

गोल्डन तिकीट का आहे खास?

गोल्डन तिकिटासाठी सुमारे ४.४ कोटी रुपयांची बोली लागली. गोल्डन तिकीट विजेत्याला उद्घाटन समारंभास उपस्थित राहण्याव्यतिरिक्त सामान्य मनोरंजन प्राधिकरण (GEA) चे अध्यक्ष तुर्की अल शेख यांच्या शेजारी बसून सामना पाहण्याची संधी मिळेल. याशिवाय तो विजेत्या समारंभाला उपस्थित राहू शकणार आहे. विजेत्या संघाच्या ग्रुप फोटोमध्ये सहभागी होता येईल. ड्रेसिंग रूममध्ये जाऊ शकतो. रोनाल्डो, मेस्सी, नेमार आणि एमबाप्पे यांसारख्या खेळाडूंना भेटू शकतील आणि जेवणही करू शकतील.

sachin tendulkar finance marathi news
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर क्रिकेटपटू की कलाकार?
IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: आशुतोष शर्माची आयपीएलमध्ये ऐतिहासिक कामगिरी, १७ वर्षांच्या इतिहासात ही कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
Gautam Gambhir Praises MS Dhoni
IPL 2024 CSK vs KKR : चेन्नईविरुद्धच्या सामन्यापूर्वी गंभीरचं मोठं वक्तव्य; म्हणाला, “धोनी हा एक कुशल…”
IPL 2024 Performance of 5 impact players
IPL 2024 : शिवम दुबे ते साई सुदर्शनपर्यंत ‘या’ ५ ‘इम्पॅक्ट प्लेयर्स’नी पहिल्या १० दिवसात गाजवलं मैदान

हेही वाचा – Team India: शुबमन गिलच्या द्विशतकानंतर टीम इंडियाचे सेलिब्रेशन; केक कापल्यानंतर प्रत्येकाने व्यक्त केले मनोगत, पाहा VIDEO

किलियन एमबाप्पे आणि नेमार यांचा देखील समावेश –

पॅरिस सेंट जर्मेन (PSG) आणि रियाध एसटी इलेव्हन यांच्यातील प्रदर्शनीय सामन्यात किलियन एमबाप्पे, सर्जियो रामोस आणि नेमारसारखे खेळाडू देखील असतील. हे तिन्ही खेळाडू पॅरिस सेंट जर्मेन (PSG) चा भाग आहेत. याशिवाय फिफा विश्वचषक स्पर्धेत अर्जेंटिनाविरुद्धच्या अपसेट सामन्यात गोल करणारा, सौदी अरेबियाचा सालेम अल-दवसारी आणि सौद अब्दुलहमीद हेही खेळणार आहेत.

हेही वाचा – IPL 2023: CSKच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; कर्णधार एमएस धोनीने सरावाला केली सुरुवात, पाहा VIDEO

सौदी ऑल-स्टार इलेव्हन विरुद्ध पॅरिस सेंट-जर्मेन यांच्यातील मैत्रीपूर्ण सामना गुरुवारी म्हणजे १९ जानेवारी रोजी भारतीय वेळेनुसार रात्री ८:३० वाजता खेळवला जाईल. हा सामना रियाधच्या किंग फहद स्टेडियमवर होणार आहे. चाहते पीएसजी टीव्ही आणि पीएसजी सोशल मीडियावर सौदी ऑल-स्टार इलेव्हन आणि पॅरिस सेंट-जर्मेनचे ऑनलाइन लाइव्ह पाहू शकतात. हा मैत्रीपूर्ण सामना भारतात टीव्हीवर प्रसारित केला जाणार नाही.