मुंबई इंडियन्सने आरसीबीचा १५ धावांनी पराभव करत शानदार विजय मिळवला. मुंबईचा वुमन्स प्रीमियर लीगमधील हा चौथा विजय आहे. या विजयासह मुंबईने प्लेऑफच्या दिशेने भक्कम पाऊल टाकलं आहे. मुंबईकडून नॅट स्किव्हर ब्रंट व हिली मॅथ्यूज यांनी वादळी कामगिरीच्या जोरावर मुंबईने हा विजय मिळवला.

रिचा घोष व श्रेयंका पाटील यांनी मुंबईसाठी हा विजय सोपा केला नाही. रिचा व श्रेयंका यांनी १९व्या षटकात २७ धावा कुटल्या. मुंबईने आरसीबीला विजयासाठी २०० धावांचं लक्ष्य दिलं होतं. मुंबईने सुरूवातीला आरसीबीचे झटपट विकेट्स घेतल्याने आरसीबी संघ मागे पडताना दिसला. श्रेयंका व रिचाने संघाचा डाव सावरला, पण संघाला विजय मात्र मिळवून देऊ शकले नाही.

मुंबईने आरसीबीला विजयासाठी २०० धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. मुंबईने दिलेल्या धावसंख्येचा पाठलाग करताना, आरसीबीची सुरुवात खराब झाली आणि त्यांनी ३१ धावांच्या संघाने ४ विकेट्स गमावल्या. त्यानंतर सहाव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर राधा यादव बाद झाली. ठराविक अंतराने गमावलेल्या विकेट्समुळे आरसीबीचा संघ सामन्यात मागे पडला. नंतर १२ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर संघाने नादिन दी क्लार्कच्या रूपात सहावी विकेट गमावली.

१५ व्या षटकात आरसीबीची धावसंख्या १०० च्या पुढे गेली. ऋचा घोषने शेवटच्या षटकांमध्ये तिच्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु ती अपयशी ठरली. ऋचा घोषने या सामन्यात ५० चेंडूत १० चौकार व ६ षटकारांच्या मदतीने ९० धावांची खेळी केली. तर नादिन दी क्लार्क हिने २८ धावांचं तर अरूंधती रेड्डी १४ धावा व श्रेयंका पाटीलने १२ धावांचं योगदान दिलं. पण ऋचाला अपेक्षित साथ न मिळाल्याने आरसीबीचा संघ २० षटकांत ९ बाद १८४ धावाच करू शकला.

मुंबई इंडियन्सकडून गोलंदाजीत शबनम ईस्माल व अमेलिया कर यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. तर हिली मॅथ्यूजने ३ विकेट्स घेतल्या. तर अमनजोत कौरने १ विकेट घेतली.

प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली. दुसऱ्याच षटकात लॉरेन बेलने सजीव सजनाला बाद केलं. मॅथ्यूज आणि नॅट स्किव्हर यांनी आरसीबीच्या गोलंदाजांची धुलाई करत १३१ धावांची भागीदारी रचली. हिली मॅथ्यूजने ३९ चेंडूत ९ चौकारांसह ५६ धावांची भागीदारी केली. तर नॅट स्किव्हर ब्रंटने ७ चेंडूत १६ चौकार व एका षटकाराच्या मदतीने १०० धावा करत शतक केलं, जे वुमन्स प्रीमियर लीगच्या इतिहासातील पहिलं शतक आहे. तर कर्णधार हरमनने २० धावांचं योगदान दिलं. यासह मुंबईने प्रथम फलंदाजी करत १९९ धावा केल्या.