Chennai Super Kings vs Mumbai Indians: मुंबई इंडियन्स संघाला अजूनही सूर गवसलेला नाही. चेन्नई सुपर किंग्स संघाविरूद्ध झालेल्या सामन्यात या हंगामत दुसऱ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. स्पर्धेतील ४४ वा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्सने २० षटकांअखेर १५९ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना कार्तिक शर्मा आणि ऋतुराज गायकवाडने दमदार अर्धशतकी खेळी केली. मुंबईला हा सामना ८ गडी राखून गमवावा लागला आहे.
चेन्नई सुपर किंग्स संघाला सामना जिंकण्यासाठी १६० धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्स संघाला सुरूवातीलाच मोठ धक्का बसला होता. कारण संजू सॅमसन अवघ्या ११ धाावा करून माघारी परतला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या उर्विल पटेलने १२ चेंडूत २४ धावांची दमदार खेळी केली. त्याला कर्णधार ऋतुराज गायकवाडची साथ मिळाली. ऋतुराज गायकवाड शेवटपर्यंत उभा राहिला. त्याने ४८ चेंडूंचा सामना करत ५ चौकार आणि २ षटकारांच्या साहाय्याने नाबाद ६७ धावांची खेळी केली. तर कार्तिक शर्माने ४० चेंडूंचा सामना करत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या साहाय्याने नाबाद ५४ धावांची खेळी केली. चेन्नईने १६० धावांचे आव्हान १८.१ षटकात पूर्ण केलं.
या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना मुंबईला सुरूवातीलाच मोठा धक्का बसला. विल जॅक्स १ धाव करुन माघारी परतला. त्यानंतर रायन रिकल्टनने ३७ धावांची खेळी केली. तर नमन धीरने ५७ धावा केल्या. सूर्यकुमार यादवने २१, तिलक वर्माने ५, हार्दिक पंड्याने १८ धावांची खेळी केली. तर रॉबिन मिंझ अवघ्या ५ धावांवर माघारी परतला. मुंबईने २० षटकांअखेर ७ गडी बाद १५९ धावा केल्या.
चेन्नईची गुणतालिकेत मोठी झेप
चेन्नईच्या विजयानंतर गुणतालितकेत मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. चेन्नई सुपर किंग्जचा संघ ९ पैकी ४ सामने जिंकून ८ गुणांसब गुणतालिकेत सहाव्या स्थानी पोहोचला आहे. तर मुंबईचा संघ ९ पैकी ७ सामने गमावून गुणतालिकेत ९ व्या स्थानी आहे.
